‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीच्या ‘साकी साकी’ गाण्याच्या नवीन ‘व्हर्जन’वर ‘भडकली’ कोयना मित्रा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सध्या अनेक गाणे रिक्रिएट होताना दिसत आहेत. जणू गाणे रिक्रिएट करण्याचा ट्रेंडच सुरु आहे. यातील अनेक गाणे चाहत्यांना आवडलेही आहेत. काही गाण्यांनी प्रेक्षकांना नाराजही केले आहे. नुकतंच रिक्रिएट झालेल्या नोरा फतेहीच्या एका गाण्यावर अभिनेत्री कोयना मित्रा भडकली आहे.

गेल्या वर्षी सत्यमेव जयते या सिनेमात दिलबर गाणं रिक्रिएट करण्यात आलं होतं. या गाण्यात नोरा फतेही दिसली होती. नोराला या गाण्यामुळे रात्रीत मोठं स्टारडम मिळालं होतं. हे गाणं खूपच सुपरहिट झालं होतं. यावर्षीही नोरा बाटला हाऊस सिनेमातील रिक्रिएट केलेल्या साकी साकी गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

नुकताच या गाण्याचा टीजर समोर आला आहे. या टीजरनंतर ओरिजिनल साकी साकी गाण्यात दिसलेली अभिनेत्री कोयना मित्राने यावरील आपला राग व्यक्त केला आहे. याबाबत कोयनाने ट्विट केले आहे.

कोयना मित्रा आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, “मुसाफिरमधील माझं साकी साकी हे गाणं रिक्रिएट केलं जात आहे. या गाण्याला सुनिधि, सुखविंदर, विशाल, शेखर यांनी मिळून गायलं होतं. मला माझ्या गाण्याचं रिक्रिएट व्हर्जन अजिबात आवडलं नाही. ही एक गडबड आहे. या गाण्याने अनेक ब्लॉकबस्टरला क्रॅश केलं होत. अखेर बाटला हाऊसमध्ये हे गाणं का घेतलं आहे?”

आपल्या ट्विटमध्ये कोयनाने नोराची स्तुतीही केली आहे. कोयना म्हणते की, “नोरा खरोखरंच सर्वोत्तम आहे. आशा करते की, नोरा आम्हाला प्राऊड फील करवेल.” नेहा कक्करने हे रिक्रिएट व्हर्जन गायलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

Loading...
You might also like