अभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच ‘ओ साकी साकी रे’ या गाण्यामुळे चर्चेत आली होती. आता आणखी एका कारणामुळे ती चर्चेत आली आहे. चेकबाऊंस प्रकरणी कोयनाला मुंबईतील अंधेरी महानगर मजिस्ट्रेट कोर्टाने दोषी ठरवत ६ महिन्यांसाठी जेलची शिक्षा सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय ?
पूनम सेठी नावाच्या मॉडेलने कोयनावर २२ लाख रुपये परत न दिल्याचा आरोप केला आहे. २०१३ साली पूनमने कोयना विरोधात चेक बाऊंसप्रकरणी केस दाखल केली होती. या आरोपांना कोयनाने चुकीचे असल्याचे सांगितले होते. शिवाय कोयनाने तिच्याविरोधात कोर्टात खटला लढण्याचा निर्णय घेतला होता.

कोयना आणि पूनमचं नेमकं म्हणणं काय ?
कोयनाचं म्हणणं होतं की, पूनमची इतकी पात्रता नाही की, ती कोणाला २२ लाख रुपये उधार देऊ शकते. तर पूनमचं म्हणणं असं होतं की, कोयनाने घेतलेले २२ लाख परत देण्यासाठीच तिला ३ लाखांचा चेक देण्यात आला होता जो बँकेत पैसे नसल्याने बाऊंस झाला होता.

..आणि कोयनाला ६ महिने जेलची शिक्षा झाली
याच चेक बाऊंसच्या कारणामुळे पूनमने १९ जुलै २०१३ रोजी कोयनाला लीगल नोटीसही पाठवली होती. यानंतरही कोयना ही रक्कम परत करण्यास असर्मथ ठरली. १० ऑक्टोबर २०१३ मध्ये पूनमने कोयना विरोधात याच प्रकरणी केस दाखल केली होती. यानंतर कोयनाने पूनमवर चेक चोरी करण्याचे आरोप लावले. परंतु कोयनाच्या याच सर्व आरोपांना मजिस्ट्रेट जज केतकी छवनने खोटे आणि चुकीचे असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर कोयनाला ६ महिने जेलची शिक्षाही सुनावण्यात आली.

काय म्हणते कोयना ?
कोयनाचं म्हणणं आहे की, “ही केस पूर्णपणे खोटी आहे. मला या प्रकरणी फसवलं जात आहे. शेवटच्या सुनावणीदरम्यान माझे वकिल कोर्टात हजर होऊ शकले नाहीत त्यामुळे माझी बाजू ऐकली गेली नाही. माझी बाजू न ऐकताच आदेश दिला गेला. मी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. माझे वकिल यासाठी प्रकिया करत आहेत.”

आरोग्यविषयक वृत्त –