माझ्या मनात अमृता सिंग विषयी खूप आदर : करिना कपूर

मुंबई : वृत्तसंस्था – आजपर्यंत करीना कपूर आणि सैफची एक्स वाईफ अमृता सिंग यांची भेट झाली नाही. पण अनेकांना या दोघींच्या नात्याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता असते. म्हणूनच नेहमी करिनाला अमृता आणि तिच्या नात्याविषयी विचारले जाते. पण या विचारलेल्या प्रश्नावर करिनाने कधीच लक्ष दिले नाही. नुकतेच ‘कॉफी विद करण ६’ च्या फिनाले एपिसोडमध्ये करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात करिनाने सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंगबद्दल खुलासा केला आहे. या कार्यक्रमात करणने अमृता सिंगबद्दल करिना कपूरला प्रश्न विचारला. या प्रश्नावर करिनाने बेधडक पणे उत्तरही दिलं.

अमृतासोबत तुझे नाते कसे आहे ? असा प्रश्न करणने करिना कपूरला विचारला नेहमी प्रमाणे अमृताचा विषय करिना टाळेल, असे वाटत असताना करिनाने करणच्या या प्रश्नाचे उत्तर देत सांगितले की, सैफसोबत लग्न झाल्यापासून मी एकदाही अमृताला भेटलेले नाही. पण अमृताचा मी प्रचंड आदर करते. ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवर मी एकदा अमृताला भेटले होते. त्यावेळी अमृता साराला घेऊन माझ्याकडे आली होती. सारा माझी खूप मोठा फॅन होती. तिला मला भेटायचे होते. त्यावेळी मी व अमृता एकमेकींशी बोललो होतो. माझे पती सैफ अली खानच्या दोन्ही मुलांचे संगोपण अमृताने एकटीने केले. याच सगळं श्रेय तिलाच आहे. त्यामुळेच तिच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे.

सैफने जेव्हा मला प्रपोज केले, त्यावेळी माझी दोन मुले आहेत आणि ते माझ्या जीवनाचा भाग आहेत, असे सांगितले होते, असेही करिनाने सांगितले तसेच कार्तिक आर्यन आणि सारा अली खान लवकरच बिग बजेट सिनेमामध्ये एकत्र दिसणार याचा खुलासाही  करिनाने केला.