कोहिनूर मिल प्रकरणी ‘मनसे’च्या नितीन सरदेसाईंची ‘ED’ कडून चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोहिनूर मिल प्रकरणात गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसूली संचलनालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांना गुरुवारी दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. ते आज ईडीच्या कार्यालयात हजर झाले असून ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. राज ठाकरे आणि उन्मेष पाटील यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
 
ईडी सध्या सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शिअर सर्व्हिसद्वारे (ILFS) मुंबईतील कोहिनूर सीटीएनएल कंपनीला दिलेल्या 860 कोटी रुपयांचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणात तपास करत आहे. कोहिूनर सीटीएनएल ही कंपनी दादरमधील सेना भवनासमोरील कोहिनूर स्क्वेअर ह्या टॉवर्सचा प्रकल्प उभारण्याचे काम करत होती.  
 
याच प्रकरणी ईडीने नितीन सरदेसाई यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.  ईडीने नोटीस बजावल्यानंतर नितीन सरदेसाई गुरुवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहिले.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उन्मेश जोशी, राजेंद्र शिरोडकर यांनी कोहिनूर मिलची जागा खरेदी केली होती. त्यावरील विकासकामासाठी आयएलएफएसकडून 860 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यामुळे आता आयएलएफएसचे नुकसान झाल्याचे समोर आहे. त्यानंतर त्यांनी कंपनीतील आपले शेअर विकले. यानंतर 2008 साली राज ठाकरे यांनी देखील आपले सर्व शेअर विकले होते, परंतू राज ठाकरे यांच्या कंपनीत सहभाग असल्या कारणाने त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.