‘कोहिनूर’ प्रकरणी राज ठाकरे यांची इडी कडून तब्बल साडेआठ तास चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर आज ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानंतर तब्बल साडेआठ तास ईडीने त्यांची कसून चौकशी केली असून राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर पडून सरळ कृष्णकुंजकडे रवाना झाले आहेत. कार्यालयातून राज ठाकरे हसतमुख चेहऱ्याने बाहेर पडले असून माध्यमांशी संवाद साधण्यास मात्र त्यांनी नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची कसून चौकशी केली. चौकशीवेळी त्यांचे कुटुंबीय सकाळपासून ईडी कार्यालयाबाहेर होते.

गरज पडल्यासच पुन्हा चौकशी :
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजची चौकशी संपली असून या प्रकरणातील अन्य आरोपींनी दिलेल्या माहितीशी त्यांनी दिलेली माहिती जुळवून पहिली जाईल. यानंतर त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावले नसून नंतर भविष्यात गरज पडल्यास मात्र चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते.

यातील इतर आरोपी म्हणजे शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी व कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी व त्यांचे तत्कालिन भागीदार राजन शिरोडकर हे असून या सर्वांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. इडी ने याआधी सोमवारी व मंगळवारी जोशी यांची चौकशी केली होती. तर शिरोडकर यांच्याकडे काल चौकशी करण्यात आली. दोघांना आजही कार्यालयात बोलाविल्याने ते अकराच्या सुमारास हजर झाले. कोहिनूर टॉवरच्या व्यवहरासंबंधीची कागदपत्रे त्यांनी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. कोहिनूर स्केअर टॉवर प्रकल्पाच्या प्रारंभापासून करण्यात आलेला व्यवहार आणि त्यासंबंधीच्या दस्ताऐवजाबाबत आरोपींकडून सविस्तर माहिती घेतली जात आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात :
कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचू नये या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज काही मनसे पदाधिकारी आणि मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज सकाळी राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित, मुलगी उर्वशी आणि बहीण, सून यांच्यासोबत कृष्णकुंजवरुन ईडीच्या कार्यालयाच्या दिशेने गेलेलं होते. कायदा व सुव्यवस्थेला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी आधीच नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतर आज त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले होते.

आरोग्यविषयक वृत्त –