‘कोहली’चा ‘धोनी’ला ‘विराट’ सलाम, आठवण करुन दिली ‘त्या’ रात्रीच्या ‘रेस’ची

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघात राहण्यासाठी फिटनेस लेवल बेस्ट असणे सर्वात आवश्यक आहे. हे आव्हान संघाच्या कर्णधार कोहलीने निश्चित निभावले आहे. यात कोहलीने गुरुवार माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची आठवण काढत एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला. ज्यात ते दोघे धावपट्टीवर होते आणि आनंद साजरा करत होते. त्यात असे वाटत आहे की, कोहली धोनींला बँटने सलाम करत आहे. त्याने फोटोला कॅप्शन देत लिहिले की, तो सामना मी कधीही विसरु शकत नाही, त्या व्यक्तीने मला फिटनेस टेस्ट सारखे पळवले. हे ट्विट त्यांने धोनीला देखील टँग केले आहे.

फिटनेसचा विचार केला तर सध्याच्या यो यो टेस्टने भारतीय संघात फिटनेसची नवी परिभाषा तयार केली आहे. यासाठीचे मानदंड देखील वाढण्यात आले आहेत. सध्या हा मानदंड 16.1 आहे.

विराटने कायम धोनीला आपला मार्गदर्शक सांगितले आहे. तो आज देखील धोनीला आपला कर्णधार मानतो. धोनीने देखील खुलासा केला होता की त्यांना विराटसाठी कर्णधार पदाचा मार्ग मोकळा केला आहे.

कोहलीने भारतीय संघाच्या फिटनेसची परिभाषा बदलली आहे. विराट भारतीय संघाला तंदुरस्त पाहू इच्छितो, विराट म्हणाले होता की, जगातील सर्वोत्तम क्रिकेटर होण्यासाठी टॉप क्लास खेळाडू देखील झाले पाहिजे.