..म्हणून पंत आजही विराटच्या रागाला घाबरतो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतात लोकसभेसह आयपीएलची हवा आहे. सर्वांवर आयपीएलची धुंद चढली आहे. परंतू भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा एका गोष्टीतून बाहेर पडलेला नाही. अजूनही तो एका गोष्टीच्या भिती खाली आहे. कर्णधार विराट कोहलीचा राग हा पंतच्या भितीच्यामागचे कारण आहे. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका एकदिवसीय सामन्यात कोहली पंतवर चांगलाच रागावला होता. पण हा राग अजूनही पंत विसरू शकलेला नाही. नुकतच त्याने याबद्दल माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अखेरच्या दोन सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीने विश्रांती घेतली होती. त्यामुळे पंतला संघात स्थान देण्यात आले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात एक गोष्ट अशी घडली की ज्यामुळे कोहली पंतवर चांगलाच वैतागलेला दिसला. या सामन्यात धोनीसारखीच स्टम्पिंग करण्याचा पंतने प्रयत्न केला. पण या प्रयत्नामध्ये पंत फसला. फलंदाज यष्टीचीत झालाच नाही, पण भारताला एक धावही गमवावी लागली. त्यामुळे कोहली पंतवर चांगलाच भडकला होता.

मी फक्त घाबरतो ते कोहलीच्या रागाला. कारण कोहली जेव्हा रागावतो तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. पण कोहली कुणावरही कारणाशिवाय रागवत नाही. त्यावेळी माझ्याकडून चूक झाली होती, त्यामुळे कोहली माझ्यावर रागावला होता, असं पंतने म्हटलं आहे.