कोल्हापूरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट, पोलिसांच्या लाठीमारात ३ जखमी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रॅक्टिस क्लब मंडळ व पोलिसांमध्ये किरकोळ वाद झाला. यामुळे मंडळाच्या कार्यकत्र्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. त्यांना उठवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करवाला लागला. या लाठीमारात तिघेजण जखमी झाले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e3f5867-bfaf-11e8-b446-5bfe47b5ed73′]

कोल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणूका ठरलेल्या वेळेप्रमाणात व्यवस्थित निघाल्या होत्या. मात्र, प्रॅक्टिस क्लब मंडळाची मिरवणूक मुख्य मिरवणूक मार्गावर उशीरा दाखल झाल्याने अन्य मिरवणूकांच्या खूपच मागे होती. हे अंतर कमी करण्यासाठी मिरवणूक जलदगतीने पुढे सरकविण्याची विनंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केली. मात्र, प्रॅक्टिस क्लब मंडळाचे तरुण ऐकत नव्हते. यावरुन पोलीस आणि युवकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर युवकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यांना उठवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या लाठीमारात मंडळाचे ३ कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे.

राज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान १६ जणांचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यात पाच जण बुडाले

या घटनेमुळे दीड तास मिरवणूक एकाच जागी थांबून होती. आमदार राजेश क्षिरसागर यांच्या मध्यस्थीने कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंत मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली. दरम्यान, जखमी कार्यकर्त्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या असहकाराच्या भूमिकेमुळेच पोलिसांना लाठीमार करावा लागला.