कोल्हापूरच्या प्रियकराने 2.5 KM रस्त्यावर लिहीलं I LOVE YOU आणि I MISS YOU

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – असे म्हणतात प्रेम करावे लागत नाही तर ते होत. प्रेमावर किती कथा, किती गाणी, किती गझल लिहल्या आणि गायल्या, किती चित्रपट बनवले. या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट असते की प्रेम व्यक्त करणे महत्वाचे असते. लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करतात. कोणी संदेश पाठवितो तर कोणी भेटवस्तू देतो. ज्या लोकांना ‘Old School Romance’ आवडतो ते पत्र लिहून व्यक्त होतात. महाराष्ट्रातील कोल्हापुरातून प्रेम अभिव्यक्तीचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका प्रियकराने आपले सर्व प्रेम रस्त्यावर दाखवले.

या मुलाने आपले हृदय तुटल्यावर लॉकडाऊनमध्ये एक कॅफे उघडला, याचे नाव आहे ‘दिल तोडा आशिक चाय वाला’. एका वेबसाईटच्या अहवालानुसार ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती गावातील आहे.

road-ilu

मंगळवारी सकाळी लोकांनी पहिले की एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर आपले प्रेम व्यक्त केले आहे. इथल्या रस्त्यावर कोणीतरी ‘I LOVE YOU आणि I MISS YOU’ लिहले होते आणि रस्त्यावर सुमारे २.५ किमीपर्यंत असे लिहिले होते. रस्त्यात एका जागेवर असे लिहिले होते की, ‘I MISS YOU जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.’

road-ilu

इतर सर्व गोष्टींप्रमाणेच हा विषय सोशल मीडियावर आला आणि येथेही झपाट्याने पसरला आणि हा विषय चर्चेचा विषय बनला. सोशल मीडियावर व्हायरल होताच स्थानिक प्रशासनाने कारवाई करत हा संदेश पुसण्यास सुरवात केली. हे काम कोणाचे आहे हे पोलिसांना अद्याप कळले नाही, परंतू असे समजले जात आहे की हे काम गावातील एका मुलाने केले आहे.

road-ilu

कोणीतरी म्हंटले आहे की प्रेमात ठोकर खाणाऱ्या प्रेमींचे कोठेच अस्तिस्त्व राहत नाही. काही या व्यक्तीसारखे One-Liners मारू लागले आहेत. तुम्हाला वाटते का की हा संदेश ज्याच्यासाठी लिहला आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला असेल?