Kolhapur ACB Trap | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 10 हजारची लाच घेताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur ACB Trap | 15 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10 हजार रूपयाची लाच (Kolhapur Bribe Case) घेणार्‍या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Bureau Maharashtra) रंगेहाथ पकडले आहेत. आता त्यांना अटक करण्यात आली आहे. (Kolhapur ACB Trap)

 

सोमनाथ देवराम चळचुक Somnath Devram Chalchuk (48, एएसआय, जयसिंगपूर पोलिस स्टेशन – Jaysingpur Police Station, कोल्हापूर (Kolhapur). रा. विजयमाला नगर, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर. मुळ रा. बाडगी, ता. पेठ, जि. नाशिक) असे लाच घेणार्‍या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते कोल्हापूर जिल्हयातील जयसिंगपूर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी जयसिंगपूर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रार अर्जावर कारवाई करून त्यांची ओमनी कार त्यांना गैरअर्जदार यांच्याकडून परत मिळवून देण्यासाठी सोमनाथ चळचुक यांनी 15 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. (Kolhapur Crime News)

 

तडजोडीअंती 10 हजार रूपयांची लाच घेण्याचे ठरले. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, सरकारी पंचासमक्ष सोमनाथ चळचुक यांनी तक्रारदाराकडून 10 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. (Kolhapur ACB Trap)

 

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरज (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उप अधीक्षक सरदार नाळे (DySP Sardar Nale), पोलिस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर,
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पोलिस हवालदार विकास माने, पोलिस नाईक सचिन पाटील,
पोलिस अंमलदार मयुर देसाई, चालक हवालदार सुजर अपराध यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :- Kolhapur ACB Trap | Anti-corruption Bureau Maharashtra: Assistant police sub-inspector in anti-corruption net while accepting bribe of 10,000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political News | ‘काहीही झालं तरी महाराष्ट्रात भूकंप होणारच’, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य

Pune Mahavitaran News | महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

MLA Amol Mitkari | ‘ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, ज्या दिवशी…’, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा सरकारला इशारा