Kolhapur ACB Trap | 3 हजारांची लाच घेताना सहाय्यक लेखाधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पन्हाळा/कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम, रस्ते कामाच्या बिलांच्या फाईल तपासून विनात्रुटी पुढे पाठवण्यासाठी कंत्राटदाराकडून (Contractor) तीन हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) सहाय्यक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer) याला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Kolhapur ACB Trap) अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. अरुण रघुनाथ मांगलेकर Arun Raghunath Manglekar (वय-55 रा. मनोरमानगर, देवकर पाणंद) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या सहाय्यक लेखाधिकाऱ्याचे नाव आहे. कोल्हापूर एसीबीच्या पथकाने (Kolhapur ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.6) पन्हाळा पंचायत समितीत (Panhala Panchayat Samiti) केली.

याबाबत कंत्राटदाराने कोल्हापूर एसीबीकडे (Kolhapur ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी पन्हाळा तालुक्यातील मौजे आरळे गावातील गटार बांधकाम व मौजे सातवे गावातील रस्ता तयार केला आहे. तक्रारदार यांच्या बिलांच्या फाईलस् (Bill Files) पन्हाळा पंचायत समितीकडे मंजूरीसाठी पाठवल्या होत्या. लेखा कक्षातील सहायक लेखाधिकारी अरुण मांगलेकर यांच्याकडे त्यांची तपासणी होणार होती. या फाईल विनात्रुटी पुढे पाठवण्यासाठी मांगलेकर यांनी तीन हजार रुपये लाच मागितली.

तक्रारदार यांनी कोल्हापूर एसीबीकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.4) पंचासमक्ष पडताळणी केली.
त्यावळी अरुण मांगलेकर यांनी तक्रारदार यांच्या बीलाच्या फाईल विनात्रुटी पुढे पाठवण्यासाठी तीन हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज (गुरुवार) पन्हाळा पंचायत समितीमध्ये सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारताना मांगलेकर याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे (ACB Pune Region) पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे
(Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
कोल्हापूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत
(Deputy Superintendent of Police Adinath Budhwan) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक नितीन कुंभार (Police Inspector Nitin Kumhar), पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर
(PSI Sanjeev Bambergekar) पोलीस अंमलदार शरद पोरे, सुनील घोसाळकर, मयुर देसाई, रुपेश माने
यांच्या पथकाने केली.

Web Title :- Kolhapur ACB Trap | assistant accounts officer in the net while accepting a bribe of rs three thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LIC Jeevan Umang Policy | LIC च्या या योजनेत दरमहिना 1302 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते 27 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम, जाणून घ्या

Beed Crime | प्रेमाचे नाटक करुन महिला पोलीस अंमलदारावर अत्याचार, ब्लॅकमेल करत उकळले तब्बल 13 लाख