Kolhapur ACB Trap | 1.75 लाखाची लाच घेताना शिरोळ नगरपरिषदचे मुख्याधिकारी, अभियंता, लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम परवाना (Construction Permit) फाईल तपासुन पुढे पाठवणे करता शिरोळ नगरपरिषदेचे (Shirol Municipal Council) मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता, लिपिक आणि खासगी व्यक्ती यांना 1 लाख 75 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Kolhapur ACB Trap) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शिरोळ नगरपरिषदेत खळबळ उडाली आहे. कोल्हापूर एसीबीने (Kolhapur ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.27) केली.

 

शिरोळ नगरपरिषद शिरोळ मुख्याधिकारी अभिजीत मारुती हराळे Chief Officer Abhijit Maruti Harale (वय 33 रा.भिलवडी, ता.पलूस, जि. सांगली), कनिष्ठ अभियंता संकेत हणमंत हंगरगेकर Junior Engineer Hanamant Hangargekar (वय 28 सद्या रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ मूळ रा.उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद), लिपिक सचिन तुकाराम सावंत Clerk Sachin Tukaram Sawant (रा.शिरोळ, जि. कोल्हापूर), खाजगी व्यक्ती  अमित तानाजी संकपाळ Amit Tanaji Sankpal (वय-42 रा. शिरोळ,जि. कोल्हापूर) अशी लाचखोरांची नावे आहेत. याबाबत 42 वर्षाच्या व्यक्तीने कोल्हापूर एसीबीकडे (Kolhapur ACB Trap) तक्रार केली आहे.

 

तक्रारदार यांचे बांधकाम परवाना फाईल तपासुन पुढे पाठवणेकरीता कनिष्ठ अभियंता संकेत हंगरगेकर आणि लिपक सचिन सावंत यांनी तक्रारदार यांचेकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली.
तर मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी तक्रारदार याची फाईल मंजूर करून बांधकाम परवाना देणेसाठी 75 हजार रुपये लाच मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी कोल्हापूर एसीबीकडे तक्रार केली.

एसबीच्या पथकाने 24, 25 आणि 27 फेब्रुवारी रोजी पदताळणी केली असता हराळे,
हंगरगेकर आणि सावंत यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सोमवारी सापळा रचला.
अभिजीत हराळे यांनी लाचेची रक्कम हंगरगेकर, सावंत आणि संकपाळ यांना स्वीकारण्यास सांगितली.
तर सचिन सावंत याने ही रक्कम खाजगी व्यक्ती अमित संकपाळ याला स्वीकारण्यास सांगितली.
त्यानंतर अमित संकपाळ याला तक्रारदार यांच्याकडून 1 लाख 75 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे (DySP Sardar Nale),
पोलीस निरीक्षक नितीन कुंभार (Police Inspector Nitin Kumhar), पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर (PSI Sanjeev Bambergekar),
पोलीस अंमलदार विकास माने, मयूर देसाई, रुपेश माने, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Kolhapur ACB Trap | Chief, Engineer, Clerk of Shirol Municipal Council caught in anti-corruption net while accepting bribe of 1.75 lakhs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | तो चुनाव आयोग नसून चुना लावणारा आयोग, उद्धव ठाकरेंचा घणाघात (व्हिडिओ)

MP Sanjay Raut | विधिमंडळ पक्ष कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला, संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात, म्हणाले – ‘हा शुद्रपणा…’

Pune Crime News | ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मुंढवा येथील ‘बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई