Kolhapur ACB Trap | पुण्यातील शेतकऱ्याकडे एक कोटीची लाच मागणारा पोलीस गोत्यात, एसीबीकडून FIR; पोलीस दलात प्रचंड खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur ACB Trap | पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठात (Maharashtra Revenue Tribunal Bench Pune) दाखल असलेल्या दाव्यांचा निकाल आपल्या बाजूने करुन देतो, असे सांगून पुण्यातील (Pune) वयस्कर शेतकऱ्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील (Kolhapur Police Headquarters) कॉन्स्टेबल विरुद्ध कोल्हापूर एसीबीने (Kolhapur ACB Trap) गुन्हा दाखल केला आहे. जॉन वसंत तिवडे John Vansat Tiwade (वय-40 रा. कोरोची. ता. हातकणंगले) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे (Police Constable) नाव आहे. कोल्हापूर एसीबीने शनिवारी (दि.6) शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

पोलीस कॉन्स्टेबल जॉन तिवडेवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Bribery Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लवकरच अटक (Arrest) केली जाईल, असे कोल्हापूर एसीबीचे (Kolhapur ACB Trap) पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwant) यांनी सांगितले. संशयित जॉन तिवडे याला यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलीस अधीक्षकांनी निलंबित (Suspended) केले होते, असेही बुधवंत यांनी सांगितले.

 

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील देहूगाव (Dehugaon) येथील 70 वर्षीय शेतकऱ्याच्या जमिनीबाबत पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठात तीन दावे दाखल आहेत. त्याची सुनावणी सुरु आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये अनोळखी व्यक्तीचा तक्रारदार शेतकऱ्याला फोन आला. तुम्ही मला प्रत्यक्ष भेटा किवां संपर्कात रहा, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला संपर्क केला. त्या व्यक्तीने शेतकऱ्याला कोल्हापूर येथील बसस्थानक परिसरात येणास सांगितले.

तक्रारदार शेतकरी 22 मार्च रोजी कोल्हापूर येथे गेले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येऊन संपर्क साधला असता फोन करणारी व्यक्ती पोलीस असल्याचे समजले. त्यानंतर त्याचदिवशी तक्रारादार व पोलीस यांची मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यावेळी जॉन तिवडे याने आपली ओळख करुन देत आपण पोलीस असल्याचे आणि महसूल खात्यातील बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले चांगले संबंध असल्याचे तक्रारदार शेतकऱ्याला सांगितले.

 

महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठ येथे आपल्या जमिनीबाबत तीन दावे दाखल आहेत.
काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले ओळखीचे संबंध असल्याने प्रलंबित खटल्याचा निकाल आपल्या बाजून लावून देतो.
असे सांगून तुमच्या विरुद्ध असलेल्या पार्टीने एक कोटी रुपये देण्याची ऑफर दिल्याचे सांगितले.
आपल्या बाजूने निकाल लावण्यासाठी आपण किती देणार अशी विचारणा करुन एक कोटी रुपये मागितले.

 

तक्रारदार यांनी घरच्यांशी बोलून कळवतो असे सांगून ते तेथून निघून गेले.
त्यानंतर त्यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवांत यांची भेट घेतली.
त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल जॉन तिवडे याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता जॉन तिवडे याने पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर शनिवारी दुपारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात (Shahupuri Police Station) तिवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

Web Title :- Kolhapur ACB Trap | demand for a bribe of one crore a crime has been registered against the police in kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | MPSC च्या गट क सेवा मुख्य परीक्षेत पुण्यात गैरप्रकार, ब्ल्यूटूथ इयरफोन जप्त; उमेदवारावर FIR

 

Petrol Diesel Price | दिलासादायक ! तेल कंपन्यांनी अपडेट केले नवे दर, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर

 

CM Eknath Shinde | आधी पक्षप्रमुख उल्लेख टाळला, आता थेट ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले…