Kolhapur ACB Trap On PSI Amit Pandey | 20 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

चंदगड : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur ACB Trap On PSI Amit Pandey | वडिलांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur) रंगेहात पकडले. अमित भागवत पांडे Amit Bhagwat Pandey (वय – 34 रा. पाटणेफाटा, मूळ रा. खोतेवाडी, ता. हातकणंगले) असे लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई शनिवारी (दि.18) दुपारी पाटणे फाटा येथे केली.

 

अमित पांडे हे चंदगड पोलीस ठाण्यांतर्गत (Chandgad Police Station) पाटणे फाटा पोलीस चौकीत (Patne Phata Police Chowki) पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या दोन महिन्यापूर्वीच ते पोलीस ठाण्यात हजर झाले होते. तक्रारदार व वडिलांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करावी म्हणून पांडे याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडीअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. (Kolhapur ACB Trap On PSI Amit Pandey)

अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता अमित पांडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला.
ठरलेल्या 40 हजार रुपया पैकी 20 हजाराचा पहिला हप्ता स्वीकारताना पांडे यांना पाटणे फाटा येथे रंगेहात पकडण्यात आले.

 

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwan),
उप अधीक्षक राजेश बनसोडे (Deputy Superintendent of Police Rajesh Bansode)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार (Police Inspector Nitin Kumbhar), सुनील घोसाळकर, नवनाथ कदम,
संदीप पडवळ, मयूर देसाई व सूरज अपराध यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Kolhapur ACB Trap On PSI Amit Pandey | kolhapur chandgad police sub inspector Amit Pandey arrested while accepting bribe of rs 20000 ACB Trap

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा