Kolhapur Ambabai Temple | अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेप्रकरणी सासऱ्यासह जावयाला ठोकल्या बेड्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात (Kolhapur Ambabai Temple) पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगून सुरक्षायंत्रणासह भाविकांमध्ये खळबळ उडवणाऱ्या दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथक (ATS) व एलसीबीने (Local Crime Branch) बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सासऱ्यासह जावयाला अटक केली आहे. अंबाबाई मंदिरात (Kolhapur Ambabai Temple) बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरताच (Spreading rumors of bomb) परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

जावई सुरेश लोंढे आणि सासरा बाळासाहेब कुरणे (दोघे रा. वडगाव, ता. हातकणंगले) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. गुरुवार पासून नवरात्र उत्सवाला (Navratra festival) प्रारंभ झाला आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी साडेचारच्या सुमारास या दोघांनी अंबाबाई मंदिरात (Kolhapur Ambabai Temple) बॉम्ब ठेवल्याची माहिती पणजी गोवा येथील पोलीस मुख्यालयात (Police Headquarters Panaji, Goa) दिली.

बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच गोवा पोलिसांनी तात्काळ याची माहिती कोल्हापूर नियंत्रण कक्षाशी (Kolhapur control room) संपर्क साधून दिली. बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे (SP Shailesh Balkwade), अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे (Additional Superintendent of Police Tirupati Kakade) यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौज फाटा अंबाबाई मंदिरात दाखल झाला. पोलिसांनी भाविकांना आणि कर्मचाऱ्यांना सूचना देऊन तातडीने बोम्ब शोधण्याची मोहीम राबवली. मात्र मंदिरात आणि परिसरात कोणतीच संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याने ही अफवा असल्याचे अधीक्षकांनी सांगितले.

दरम्यान, उत्सव काळात पोलिस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन यंत्रणेची तारांबळ उडवणाऱ्या संशयितांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले.
त्यानुसार पोलिसांनी मोबाईल लोकेशन द्वारे दोघांना ताब्यात घेतले.
आरोपींचा शोध घेण्यासाठी चार पथके सांगली जिल्ह्यात रवाना केली होती.
आज (शुक्रवार) सकाळी दोघांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव (Police Inspector Pramod Jadhav)
आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे (juna rajwada police station) पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे (Police Inspector Dattatraya Nale) यांनी सांगितले.

Web Title :- Kolhapur Ambabai Temple | youth arrested along father in law spreading rumors bombing ambabai temple of kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap on Sujata Patil | वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Gas Price Hike | ऐन सणासुदीच्या काळात घरगुती गॅस दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका

Obesity | वजन कमी करण्याचे उपाय ! प्रामाणिकपणे करा ‘ही’ 4 कामे, आपोआप कमी होत जाईल लठ्ठपणा