ठरलं … ! कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघातून सेनेचे ‘हे’ उमेदवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांकरिता सर्व पक्षांमध्ये हालचाली सुरु आहेत. दरम्यान कोल्हापुर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदार संघातील उमेदवारांविषयीची बैठक मातोश्री येथे घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत कोल्हापूर मतदार मतदारसंघातून प्रा.संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदार संघातून धैर्यशील माने हेच शिवसेनेचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंडलिक आणि माने यांना लोकसभेत पाठ्वण्यासाठी तयारीला लागा असे आदेश देखील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

बैठकीच्या सुरवातीलाच उध्दव ठाकरे यानी कोणाही शिवसैनिकाने मनात संभ्रमवस्था न ठेवता आजपासुनच प्रचाराला लागण्याचे आवाहन केले. कोल्हापूरात खूप चर्चा सुरू आहेत. हा येणार आहे. तो येणार आहे असल्या चर्चा आता बंद करा असे आवाहन करून ते म्हणाले की, प्रा. संजय मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातुन तर धैर्यशिल माने हे हातकणंगले मतदारसंघातुन यांना उमेदवारी देण्याचे जवळजवळ निश्‍चित आहे. यापुर्वीच्या निवडणुकीत धनंजय महाडिक शिवसेनेत येणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीतुन त्यांनी उमेदवारी मिळणार की नाही याची खात्री नव्हती त्यामुळे ते दोन्हीकडे संपर्क ठेऊन होते.