Kolhapur Anti Corruption | महापुराच्या मदतीसाठी लाच मागणारा शिपाई अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Anti Corruption | करवीर तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या शिपायास महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या दाखल्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना अटक (Kolhapur Anti Corruption) करण्यात आली आहे. शिवाजी दत्तात्रय चौगले (वय ४३) असे या शिपायाचे नाव आहे.

महापुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल परमिट रुम बिअर बारचे नुकसान झाले होते.
हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सरपंचाच्या सहीचा ना हरकत दाखला जोडणे आवश्यक असते.
या दाखल्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायतीत अर्ज दिला होता. हबरज देण्यासाठी शिपाई शिवाजी चौगले याने तीन हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने 24 ऑगस्ट 2021 रोजी अर्ज दिला होता.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पंच साक्षीदारांच्या समक्ष आंबेवाडी ग्रामपंचायतीचा शिपाई शिवाजी चौगुले याची पडताळणी केली असता त्याने लाच मागितल्याचं निष्पन्न झालं.
त्यामुळे त्याला अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश मोरे,
हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलीस नाईक सुनील घोसाळकर,
कृष्णात पाटील, रुपेश माने या पथकाने केली.

Web Titel :- Kolhapur Anti Corruption | shivaji dattatraya chougale 43 of ambewadi gram panchayat in karveer taluka was arrested by anti corruption kolhapur while taking bribe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Param Bir Singh | परमबीर सिंग यांच्याविरूध्द आणखी एका पोलिस निरीक्षकाची गंभीर तक्रार ! होणार खुली चौकशी?

Sanjay Raut | ‘गुजरातमध्ये 21 हजार कोटींच हेरॉईन सापडलं, मग आता तोंडात बोळा कोंबून का बसलेत?’ – संजय राऊत

Mumbai High Court | वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेला घर सोडण्याचे न्यायालयाचे आदेश