Kolhapur Article 144 | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रकरणी कोल्हापुरात 144 कलम लागू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि कानडिगांच्या महाराष्ट्राला वाढत्या त्रासामुळे कर्नाटकात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. यावेळी काही विपरीत घडू नये, यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 144 कलम (Kolhapur Article 144) लागू केले आहे. त्यामुळे आजपासून पुढील काही दिवस कोल्हापुरात संचारबंदी (Kolhapur Article 144) लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संदर्भात महाविकास आघाडीने 10 डिसेंबरला आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सीमा भागातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकादेखील होत आहेत. काही विपरीत घडल्यास किंवा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 9 ते 23 डिसेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदीचा (Kolhapur Article 144) आदेश लागू करण्यात आल्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिले आहेत.

शनिवारी 10 डिसेंबर 2022 रोजी कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आमंत्रित केले गेले आहे.
महाविकास आघाडी तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळ,
कोल्हापूर येथे एकत्रित जमून निषेध व्यक्त करणार आहेत. आगामी काळात महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न शांत
न झाल्यास महाराष्ट्र बंदचादेखील इशारा महाविकास आघाडीकडून देण्यात आला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा
केल्यापासून हा वाद सुरू झाला होता. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर बेळगावात महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड
आणि गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. तेव्हापासून हा वाद जास्तच चिघळला आहे.
महाराष्ट्र सरकार याबाबतीत नरमाईची आणि सामंजस्याची भूमिका घेत आहे.
त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

Web Title :- Kolhapur Article 144 | section 144 applied in kolhapur action if more than 5 people gather

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Basavaraj Bommai | ‘महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही’ – बसवराज बोम्मई

Mumbai Ahmedabad Bullet Train | मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियंका चोप्राने जागतिक स्तरावर बॉलिवूडवर केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत