कोल्हापुरातील रुग्णालयात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोल्हापूरमध्ये सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला भीषण आग लागल्याची घटना घडली. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असताना ही मोठी दुर्घटना घडली. पहाटेच्या सुमारास अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये धूर आणि लोळ उठले होते.

आगीची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. कोल्हापूरमधल्या सीपीआर शासकीय रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला पहाटे आग लागली होती आता ही आग आटोक्यात आली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. रुग्णालयात कोरोनाच्या संसर्गामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना आग लागली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पहाटे सीपीआर रुग्णालयात जाऊन घटनास्थळाची पहाणी केली. तर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीमुळै रुग्णांचा मनात भीतीचं वातावरण असून परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like