Kolhapur Crime | धक्कादायक ! 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीनं राहत्या घरात घेतला गळफास

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime | एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्याच्या (Kolhapur Crime) शिरोळ (shirol) तालुक्यातील दत्तवाड येथे शुक्रवारी दुपारच्या दरम्यान घडली. दुपारी घरी कोणी नसाताना मुलीनै राहत्या घरी गळफास घेतला. संध्या अरिहंत सवळे (Sandhya arihant savale) (वय, 17) असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत पोलिसांना (Police) कळवण्यात आलं आहे.

 

याबाबत माहिती अशी, संध्याने (Sandhya savale) शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास घरी कोणी नसताना तिने घरातील आड्याला दोरीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. अल्पवयीन मुलीनं अशाप्रकारे जीवनाचा शेवट केल्याने कुटुंबीयांना एक धक्का बसला आहे. या घटनेबाबत पोलिसांना कळवले असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. (Kolhapur Crime)

 

दरम्यान, या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलीनं आत्महत्या (Suicide) का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची स्थानिक पोलिसांनी नोंद घेतली आहे. नेमकी आत्महत्या का केली? याचा शोध पोलिस (Police) घेत आहेत.

 

Web Title :- Kolhapur Crime | 17 years old minor girl commit suicide in dattawad shirol taluka of kolhapur

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Online Gaming | मुलांना ऑनलाइन गेमिंगच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी पालक आणि शिक्षकांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Identify Fake Notes | तुमच्या खिशात पुन्हा 500 ची बनावट नोट तर आली नाही ना? या पध्दतीनं ओळखा खरी की बनावट; जाणून घ्या (व्हिडिओ)

PMC Jica Project | जायका प्रकल्पाबाबत महत्वाचे निर्णय, तात्काळ होणार ‘या’ सर्व गोष्टी – खासदार गिरीश बापट यांची माहिती