Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील संतापजनक घटना ! 6 वर्षाच्या चिमुकलीवर 36 वर्षीय नराधमाकडून अत्याचार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एक संतापजनक प्रकार (Kolhapur Crime) समोर आला आहे. एका 36 वर्षीय नराधमाने 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार (Tortures) केल्याची घटना घडली आहे. कपिल अशोक हत्तलगे (Kapil Ashok Hattalge) (वय, 36) असं त्या नराधमाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी इचलकरंजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Ichalkaranji Shivaji Nagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक (Arrested) केली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, येथील शाहूनगर (Shahunagar) गल्ली नंबर 3 मध्ये राहणारा कपिल हा विवाहित असून त्याला 3 मुली आहेत. तो परिसरातील एका यंत्रमाग कारखान्यात (Spinning Mills) कामगार आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास संशयिताने एका चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून एका यंत्रमाग कारखान्याच्या जवळ नेऊन तिच्यावर अत्याचार केला. (Kolhapur Crime)

 

दरम्यान, त्यानंतर पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला.
त्यानंतर बुधवारी तिला आयजीएम रुग्णालयात (IGM Hospital) दाखल करण्यात आले. या घटनेबाबत गाजावाजा होताच परिसरातील तरुणांनी नराधम कपिलचा शोध घेतला. पण तो पसार होता. संतप्त झालेल्या तरुणांनी त्याच्या घरावर हल्ला करत साहित्याची तोडफोड केली. या घटनेबाबत माहिती समजताच शिवाजीनगर पोलिस (Shivajinagar Police) घटनास्थळी दाखल झाले. संशयित कपिलला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे.

 

Web Title :- Kolhapur Crime | 36 year old man tortures girl in chandur taluka hatkanangle district kolhapur crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा