Kolhapur Crime | गावकऱ्यांनी ओलीस ठेवलेल्या 69 ऊस कामगारांचं कोल्हापूरातून रेस्क्यू; महिलांसह लहान मुलांची सुटका, जाणून घ्या प्रकरण

0
72
Kolhapur Crime | 69 sugarcane workers rescued from kolhapur held hostage release
file photo

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून (Guna district in Madhya Pradesh) कोल्हापूरात (Kolhapur Crime) आलेल्या कामगारांना गावकऱ्यांनी ओलीस (hostage) ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ओलीस ठेवलेल्या कामगारांना गावकऱ्यांनी ना पगार दिला, ना त्यांना व्यवस्थित जेवण दिलं गेलं. गुना पोलिसांनी (Guna police) 69 मजुरांची सुटका (sugarcane workers rescue) केली आहे. यामध्ये 15 पेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे. हे सर्व कामगार सहारिया-आदिवासी समजातील असून शिवपुरी येथील एका व्यक्तीनं त्यांना काम मिळवून देण्याच्या नावाखाली महाराष्ट्रात (Kolhapur Crime) आणले होते.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर रोजी सहारिया समाजातील सुमारे 69 महिला, पुरुष आणि मुले, जिल्ह्यातील धरणवाडा (Dharanwada) आणि कँट भागातील (Kant areas) आदिवासी (Tribal) महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात मजुरीच्या शोधात आले होते. तेथे कामाच्या शोधात सर्व लोक कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) कागल तालुक्यातील गावातील नदीकाठावर पोहोचले. जिथे लोकांनी त्यांच्या असाह्यतेचा फायदा घेत सर्वांना ऊसाच्या शेतात काम करायला लावले. त्या बदल्यात केवळ जेवण देण्यात आले. या कामगारांना वेतनापोटी पैसे न देता त्यांना अमानुष वागणूक दिली जात होती. विरोध केल्यावर गावकऱ्यांनी त्यांना ओलीस ठेवले आणि त्यांचे ये-जाण, फिरणं बंद केलं होतं.

अशा प्रकारे केले रेस्क्यू ऑपरेशन
दरम्यान नातेवाईकांना माहिती दिल्यानं कोल्हापूरात अडकलेल्या मजुरांना कोणाशी बोलू दिले नाही. त्यानंतर या कामगारांनी गुनामधील त्यांच्या नातेवाईकांना गुप्तपणे घटनेची माहिती दिली. संबंधितांनी घटनेची माहिती पोलीस अधीक्षकांना (SP) दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी फ्रँक नोबल ए (Collector Frank Noble A.) यांनी कामगारांना घरी परतण्यासाठी गाडी उपलब्ध केली. गाडी उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील पोलिसांचे पथक कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. या पथकाकडून जिल्ह्यात कामगारांचा शोध घेण्यात येत होता. तपासादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नदीकाठच्या गावात त्यांना ओलीस ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

पोलिसांच्या पथकाने गावात जाऊन पाहिले असता जिल्ह्यातून कामाच्या शोधात आलेले महिला,
पुरुष आणि लहान मुले असे एकूण 69 जण अत्यंत दयनीय अवस्थेत ऊसाच्या शेतात काम करत होते.
पोलिसांनी मजुरांची गावकऱ्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका करुन त्यांना पुन्हा गुना येथे नेण्यात आले.

 

Web Title :- Kolhapur Crime | 69 sugarcane workers rescued from kolhapur held hostage release

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mera Ration App | ‘माझे रेशन’ अ‍ॅपच्या मदतीने Ration Card संबंधी सर्व समस्या होतील दूर, कार्डधारकांना मिळतील या सुविधा

Palghar Crime | विवाहितेने अनैतिक संबंध तोडले; शेजाऱ्याने तिच्या चिमुकल्याला सोबत केलं ‘हे’ कृत्य

Omicron Covid Variant | महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितलं