Kolhapur Crime | धक्कादायक ! 9 वीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 5 वर्षे लैंगिक अत्याचार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – नववीत शिकणाऱ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सलग पाच वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) उघडकीस आला आहे. आरोपीने मोबाईलवर अश्लील फोटो (Obscene Photo) व्हायरल करण्याची धमकी (Threat to Viral) देत, तिच्यावर अनेक वेळा बलात्कार (Rape) केला. आरोपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखून मागील पाच वर्षापासून विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. कोल्हापूरात (Kolhapur Crime) घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगी सज्ञान झाल्यावर आरोपीकडे लग्नासाठी विचारणा केली. त्यावेळी आरोपीनं तिच्यासोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. याप्रकरणी पीडित मुलीने गुरुवारी (दि.15) पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल (FIR lodged) केली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक (Accused Arrest) केली आहे. उद्धव किरण महाडिक (वय-26 रा. जुना बुधवार पेठ, निकम गल्ली, कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महाडिक याने पीडित मुलगी इयत्ता नववीत शिकत असताना तिचा पाठलाग करुन प्रेमसंबंधासाठी विचारणा केली होती. पीडित मुलगीही अज्ञान असल्याने आरोपीच्या जाळ्यात अडकली. यानंतर आरोपीने मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिचे अश्लील फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले.

फोटो घरच्यांना दाखवण्याची दिली धमकी

आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो घरच्यांना दाखवण्याची धमकी मुलीला दिली.
तसेच तिला लग्नाचे आमिष दाखव तिच्यावर वेळोवेळी विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला.
आरोपीने जुलै 2016 ते जुलै 2021 या पाच वर्षाच्या काळात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
दरम्यान, पीडित मुलगी सज्ञान झाल्यावर तिने आरोपी महाडिक याच्याकडे लग्नासाठी विचारणा केली.
पण आरोपीने लग्न करण्यास नकार दिला.

याप्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत धाव घेत आरोपी उद्धव महाडिक विरोधात फिर्याद दिली.
पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, लग्नाचं आमिष दाखवत लैंगिक शोषण आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रात्री उशीरा आरोपीला अटक केली.
पुढील तपास पोलीस करित आहेत.

Web Title : kolhapur Crime | 9th grade girl trap in love give lure of marriage and raped for 5 years in kolhapur

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Corona Vaccination | 18 वर्षांखालील देखील मुलांचं लसीकरण होणार; केंद्र सरकारची माहिती

Pooja Chavan Suicide Case | पोलिसांकडून संजय राठोडांना ‘क्लिन चिट’ देण्याचा संबंधच नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

T20 World Cup | भारत-PAK मध्ये होणार जोरदार टक्कर, UAE आहे तयार, दोन्ही टीम एकाच ग्रुपमध्ये