Kolhapur Crime | शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला 4 वर्षाची शिक्षा,10 हजारांचा दंड

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur Crime) घडली होती. शाळेतील चित्रकला शिक्षकाने शाळकरी मुलीवर लैगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी चित्रकला शिक्षक शितलकुमार बळवंत माने (वय-38 रा. समर्थ प्लाझा, मंगेशकर कॉलनी, उचगाव, ता. करवीर) याला कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्हा सत्र न्यायाधीश ए.एम. महात्मे (District Sessions Judge A.M. Mahatme) यांनी 4 वर्षे सक्त मजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसंच पीडित बालिकेला 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपी माने हा शाळेत चित्रकला शिक्षक (drawing teacher) असल्याने शिकवत असताना पीडित अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली. पीडित मुलगी घरी आपल्या आईचा मोबाईल वापरत होती. आरोपीने या मुलीसोबत गोड बोलून मोबाईल नंबर घेतला. तसेच त्याने स्वत:च्या मोबाईलवरुन मुलीच्या आईच्या मोबाईलवर अश्लिल व्हॉट्सअ‍ॅप मेसेज (Pornographic WhatsApp message) पाठवले. तसेच मुलगी शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील वॉशरुममध्ये गेली असता आरोपी माने याने खालच्या मजल्यावरुन मुलीकडे पाहून अश्लिल हातवारे (Kolhapur Crime) केले.

मुलीने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात (Rajarampuri Police Station) माने विरोधात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संजय साळुंखे (Police Inspector Sanjay Salunkhe) यांनी शितलकुमार माने विरोधात लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 13 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला. त्यानंतर माने विरोधात कोर्टात आरोपपत्र (charge sheet) दाखल केले.

जिल्हा सत्र न्यायाधीश महात्मे यांच्यासमोर कोर्टात सुनावणी झाली.
विशेष सरकारी वकील अमित कुलकर्णी (Special Public Prosecutor Amit Kulkarni) यांनी 8 साक्षीदार तपासले.
पीडित मुलगी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
कोर्टाने आरोपी माने याला दोषी ठरवत त्याला 4 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड तसेच पीडित मुलीला 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली.

विशेष सरकारी वकील अमित कुलकर्णी यांना अ‍ॅड. भारत शिंदे (Adv. Bharat Shinde),
अ‍ॅड. महेंद्र चव्हाण (Adv. Mahendra Chavan) तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय साळुंखे,
साहयक फौजदार शाम बुचडे, अशोक शिंदे, माधवी घोडके यांचे सहकार्य लाभले.

Web Title :- Kolhapur Crime | a painting teacher has been sentenced by a court for sexually abusing a young girl

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | बेपत्ता तरुण बिल्डरचा विहिरीत आढळला मृतदेह, खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप; परिसरात प्रचंड खळबळ

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 189 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Honeymoon | ‘हनीमून’दरम्यान जोडप्यासोबत घडली विचित्र घटना, 27 वर्षीय तरूणीला चक्क 10 दिवस अनोळखींसोबत ‘झोपावं’ लागलं