Kolhapur Crime | नातेवाईकांच्या WhatsApp वर ‘गुडबाय’ मेसेज टाकून तरुणीचा केला खून; तरुणाने विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न, कोल्हापूरातील धक्कादायक घटना

कोल्हापूर : Kolhapur Crime | नातेवाईकांच्या व्हॉटसअ‍ॅपवर ग्रुपवर ‘गुडबाय’ असा मेसेज टाकून एका तरुणाने त्याच्या नात्यातील तरुणीचा पन्हाळा तालुक्यातील गिरोली घाटात नेऊन खून केला. त्यानंतर स्वत: विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Kolhapur Crime)

ऋतुजा प्रकाश चोपडे (वय २१, रा. खोतवाडी, इचलकरंजी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. कैलास आनंदा पाटील (वय २८, रा. लिंगनूर ता़ कागल) याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (Kolhapur Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा आणि कैलास हे नात्यातील असल्याने एकमेकांना ओळखत होते. कैलास हा फरशी बसविण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल पुरविण्याचे काम करतो. ऋतुजा ही बी़ एस्सीचे शिक्षण घेत होती. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा होती. पण लग्नाला काही नातेवाईकांचा विरोध होता. त्यामुळे ते लांबणीवर पडत होते. कैलास याने ऋतुजा हिला मंगळवारी भेटण्यासाठी बोलाविले. त्यानंतर तिला तो कारने गिरोली घाटात घेऊन गेला. त्या ठिकाणी त्यांच्यात लग्नावरुन वाद झाला. तेव्हा त्याने तिचा खून केला. त्यानंतर त्याने दोघांच्या नातेवाईकांच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर ‘गुडबाय’ असा मेसेज टाकला.
स्वत: विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Murder In Kolhapur)

कैलास याने ग्रुपवर टाकलेला मेसेज वाचून तरुणीच्या नातेवाईकांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात
(Pethwadgaon Police Station) धाव घेतली.
त्यानंतर पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन तपासून गिरोली घाटात पोहचले.
त्यांनी कैलास याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title :- Kolhapur Crime | A young woman was killed by sending a ‘goodbye’ message on relatives’ WhatsApp; A young man tried to commit suicide by drinking poison, a shocking incident in Kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena On Shinde-Fadnavis Govt |शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला गंभीर इशारा, दसरा मेळाव्याला परवानगी दिली नाही तर…

PCMC Recruitment | पिंपरी चिंचवड महापालिका नोकरभरती; 386 जागांसाठी सव्वालाखांहून अधिक उमेंदवारांचे अर्ज ; उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी दिली मुदतवाढ