Kolhapur Crime | खळबळजनक! लग्नाचे आमिष दाखवून सहकारी महिलेवर अत्याचार, कळंबा जेल अधिकाऱ्याला अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime | महिला शिपायाला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कळंबा जेलच्या अधिकाऱ्याला (Kalamba Jail Officer) पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. या बाबत पीडित महिलेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात (Juna Rajwada Police Station) फिर्याद दिली आहे. तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी जेल अधिकारी योगेश भास्कर पाटील (Yogesh Bhaskar Patil) याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी (Kolhapur Crime) सुनावण्यात आली.

पीडित महिला शिपाई कळंबा जेलमध्ये कार्यरत आहे. जेल अधिकारी योगेश पाटील याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. तसेच जातिवाचक शिवीगाळ (Caste Abuse) केल्याची तक्रार महिलेने पोलिसांकडे दिली. यानंतर अटकेची कारवाई (Kolhapur Crime) करण्यात आली.

जेल अधिकारी योगेश पाटील याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून 2021 पासून लैंगिक अत्याचार केले.
दरम्यान, दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पीडित महिलेने पाटील याच्यासोबत असलेले संबंध तोडले.
त्यानंतर त्याने महिलेला जातिवाचक शिवीगाळ करुन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
आरोपीच्या त्रासाला वैतागून महिलेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत योगेश पाटील विरुद्ध तक्रार
(FIR) केली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आरोपी योगेश पाटील याला तात्काळ अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :-Kolhapur Crime | abuse of a female colleague with the lure of marriage kalamba jail officer arrested kolhapur crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Patil Nilangekar | संभाजी पाटील निलंगेकरांचा देशमुखांच्या भाजप प्रवेशाला विरोध, म्हणाले – ‘… म्हणून लातूरच्या प्रिन्सची भाजपात येण्याची इच्छा’

Nitesh Rane | ‘तो फक्त सिरीयल पुरताच आहे…,’ म्हणत नितेश राणेंकडून अमोल कोल्हेंवर एकेरी शब्दात टीका