Kolhapur Crime | दुर्दैवी ! दांडीया पाहून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

कोल्हापूर/बाजाभोगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  नवरात्र उत्सवाची धामधूम सुरु असताना कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) या उत्सवाला गालबोट लागले आहे. दांडिया (Dandiya) पाहून गावी परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला कचरा भरुन निघालेल्या डंपरची (garbage dumper) धडक बसली. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू (accidental-death) झाला तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कोल्हापूर (Kolhapur Crime) मध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शाहुपूरी पाचव्या गल्लीत गवत मंडई जवळ घडली.

ओंकार दिनकर मुगडे Omkar Dinkar Mugade (वय-19 रा. काळजवडे, ता. पन्हाळा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तर दुचाकीवर मागे बसलेले शिवाजी विकास नेमणे Shivaji Vikas Nemne (वय-18 रा. कांटे, शाहूवाडी) व करण पाटील Karan Patil (रा. काळजवडे, पन्हाळा) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या कचरा डंपरवर सतीश देवेकर (Satish Devekar) हे चालक म्हणून काम करतात.
मंगळवारी मध्यरात्री ते कचरा गोळा करण्यासाठी डंपर घेऊन गोकुळ हॉटेलकडून गवत मंडईकडे जात होते.
त्यावेळी पटेल स्पेअर पार्ट जवळ डंपर आला असता पाचव्या गल्लीतून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीची धडक डंपरच्या टाकीला बसली.
अपघातानंतर देवेकर यांना गाडी थांबवून पाहिले असता तीन तरुण रक्ताच्या थारोळ्यात (Kolhapur Crime) पडल्याचे दिसले.

जखमी झालेल्या तिघांना अग्निशमन वाहनांच्या मदतीने सीपीआर रुग्णालयात (CPR Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातातील ओंकार मुगडे याच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर दोघांवर उपचार सुरु आहेत.

 

गावी जाताना अपघात

अपघातातील ओंकार, शिवाजी आणि करण हे तिघे पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील आहेत.
त्यांच्या गावातील एकाचे शहरात हॉटेल असून त्याठिकाणी हे तिघेही कामाला होते.
नवरात्रिनिमित्त देवदर्शन व दांडीया पाहण्याचे ठरवून तिघेही हॉटेलवरुन निघाले.
शहरात फेरफटका मारुन गावी जात असताना त्यांचा अपघात झाला.

मयत ओंकार हा हॉटेलमध्ये काम करुन करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील स.ब. खाडे महाविद्यालयात प्रथम वर्ग बी.ए.च्या वर्गात शिकत होता.
आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती बेताची आहे. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांनी हृदय पिळवटणारा आक्रोश केला.
ओकांरच्या पश्चात आई-वडिल, आई, दोन बहिणी असा परिवार आहे.

Web Title : Kolhapur Crime | accidental death of omkar dinkar mugade in kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Post Office Schemes | दररोज 150 रुपयांच्या सेव्हिंगने बनवू शकता 15 लाखापर्यंतचा फंड; Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक

Pune Crime | 11 गंभीर गुन्ह्यातील आरोपी अ‍ॅड. सागर सुर्यवंशीची येरवडा जेलमध्ये रवानगी

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी, 47 हजारच्या जवळ पोहचले; चांदीची सुद्धा चमक वाढली, जाणून घ्या नवीन दर