Kolhapur Crime | ‘आई, घरी सोडतो’ असं म्हणत महिलेला गाडीत बसवलं, काही अंतर गेल्यानंतर दाम्पत्याने महिलेसोबत केला भयंकर प्रकार; कोल्हापुरातील खळबळजनक घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून काही अंतरावर गेल्यावर महिलेच्या अंगावरील दागिने लुटल्याची (Jewelry looted) खळबळजनक घटना कोल्हापुर जिल्ह्यात (Kolhapur Crime) घडली आहे. ही घटना कोल्हापुर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) मलकापूर (Malkapur) येथे काही दिवसांपूर्वी घडली होती. आरोपींनी ‘आई, घरी सोडतो’ असे म्हणत महिलेची लुट केली होती. आरोपींनी निर्जनस्थळी गेल्यानंतर पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी (Death threats) देऊन दागिने लुटले होते. याप्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (Criminal Investigation Squad) घटनेच्या 22 दिवसांनी आरोपी दाम्पत्याला बेड्या (couple Arrest) ठोकल्या आहेत.

 

सलमान मुबारक खान तांबोळी (वय-29) आणि त्याची पत्नी आयेशा तांबोळी (वय-24 रा. नाईकबोमवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. आरोपींनी 16 नोव्हेंबर रोजी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मलकापूर येथील मंगल ज्ञानदेव कुंभार Mangal Kumbhar (वय-52) यांना लुटलं (Kolhapur Crime) होतं. आरोपींनी फिर्यादी महिलेच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल घेऊन फरार झाले होते. गुन्हे शाखेने मंगळवारी (दि.7) सापळा रचून दोघांना अटक केली. (Kolhapur Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगल कुंभार या 16 नोव्हेंबर रोजी मलकापूर येथील पेरीड नाका (Perid Naka) परिसरात रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपी दाम्पत्य कार घेऊन त्यांच्याजवळ आले. आरोपींनी फिर्यादी यांना विश्वासात घेत ‘आई, तुम्हाला कुठे जायचं आहे. चला घरी सोडतो’ असं सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास बसल्याने त्या कारमध्ये बसल्या. काही अंतर पुढे गेल्यानंतर एका निर्जनस्थळी आरोपींनी मंगल कुंभार यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेऊन पोबारा केला.

 

आरोपींनी फिर्यादी यांना ज्योतिबा मार्गावरील केर्ली फाटा येथे सोडून निघून गेले.
या प्रकारानंतर घाबरलेल्या मंगल यांनी पोलिसांत जाऊन फिर्याद दिली.
पोलीस मागील 22 दिवसांपासून आरोपींचा शोध घेत होते.
अखेर मंगळवारी आरोपी दाम्पत्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या कारसह 3 लाख 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Kolhapur Crime | couple looted ornament and mobile from woman by giving lift in malakapur kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा