×
Homeकोल्हापूरKolhapur Crime | चुलतीवर बलात्कारप्रकरणी पुतण्याला 10 वर्षांची सक्तमजुरी, कोल्हापूरमधील घटना

Kolhapur Crime | चुलतीवर बलात्कारप्रकरणी पुतण्याला 10 वर्षांची सक्तमजुरी, कोल्हापूरमधील घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – घरावरील खापऱ्या काढत घरात प्रवेश करून शेजारीच राहणाऱ्या चुलतीवर बलात्कार करणाऱ्या नराधम 30 वर्षीय पुतण्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जामीन न मिळाल्याने आरोपी अटकेपासून जेलमध्येच आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) चंदगड तालुक्यात 7 फेब्रुवारी 2021 मध्ये घडली होती. अतिरिक्त जिल्हा (Kolhapur Crime) सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी आज हा निकाल दिला.

 

तसेच, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी आणि दोन वेगवेगळ्या कलमान्वये प्रत्येकी 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपीला सर्व शिक्षा एकाचवेळी भोगण्याचे आदेश दिला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार नराधम पुतण्याने भर दिवसा शेजारीच राहत असलेल्या चुलतीवर चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला होता. जर पोलिसांत तक्रार केली तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही तिला दिली. या घटनेनंतर चुलतीने चंदगड पोलिसांत तक्रार दिली आणि पुतण्याला अटक करण्यात आली होती.

 

पोलिसांनी या घटनेचा तपास करून न्यायालयात चार्जशीट दाखल केली.
त्यानंतर, सरकरी पक्षाकडून 7 साक्षीदार तपासण्यात आले. पुरावे आणि सरकारी वकील अ‍ॅड. एस. ए. तेली
यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी त्या पुतण्याला सख्ख्या चुलतीवरील बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावली.

 

Web Title :- Kolhapur Crime | cousin raped by breaking into the house in broad daylight 30 year old nephew sentenced to 10 years kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मुलाच्या त्रासामुळे 17 वर्षाच्या युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगरमधील घटना

Kirit Somaiya-Sai Resort | साई रिसॉर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी चुकीची माहिती दिली; अधिकाऱ्यांचा खुलासा

Chennai Super Kings (CSK) | धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण? सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ मोठा खुलासा

Must Read
Related News