Kolhapur Crime | धक्कादायक ! पत्नीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 10 लाखाची मागितली खंडणी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Kolhapur Crime | कोल्हापुरात (Kolhapur Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 10 लाख (10 lakhs) रुपयांची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीनं पीडित महिलेच्या पतीला अडवून ही धमकी दिली होती. बदनामी होईल या भीतीनं फिर्यादीनं आरोपीचा नाहक त्रास सहन केला. शेवटी फिर्यादीने पोलीसात याबाबत तक्रार नोंद केलीय. याप्रकरणी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल (FIR) झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, देवदास बाळासाहेब घारे (Devdas Balasaheb Ghare) असं आरोपीचं नाव आहे. तो कोल्हापूरातील जिवबा नाना जाधव पार्क परिसरातील रहिवासी आहे. संशयित आरोपी देवदास घारे याने (23 ऑगस्ट) रोजी फिर्यादीचा रस्ता अडवून धमकी दिली होती. तुझ्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो माझ्याकडे आहे. त्यामुळे लवकरात लवकर 10 लाख रुपये दे, नाहीतर संबंधित सर्व फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन’ अशी धमकी दिली होती.

दरम्यान, बदनामीच्या भीतीने फिर्यादीनं काही दिवस संबंधित बाब गुप्त ठेवली.
आरोपीकडून वाढता त्रास लक्षात घेता, फिर्यादीनं कोल्हापुरातील करवीर पोलीस ठाण्यात (Karveer Police Station) फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी देवदास घारे विरोधात खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी अजुन आरोपीला अटक केली नसून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Kolhapur Crime | demand 10 lakh threatening to viral wifes obscene videos and photos crime in kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MP Vinayak Raut | विनायक राऊतांचा राणे पुत्रांना टोला; म्हणाले – ‘टिंगू-मिंगू बडेजाव मारायला लागले’

Modi Cabinet Decisions | मोदी सरकारच्या ‘या’ मोठ्या निर्णयाने लाखो लोकांना मिळेल रोजगार, जाणून घ्या प्लॅन

Ravet Police Station | देहुरोड पोलीस ठाण्याचे विभाजन करुन रावेत पोलीस स्टेशनच्या निर्मितीस शासनाची मंजुरी