Kolhapur Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाच्या गैरसमजातून जन्मदात्या बापाची मुलाने केली हत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime | मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी फावड्याचा वर्मी घाव घालून हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री पन्हाळा तालुक्यातील (Kolhapur Crime) माले येथे घडली. वडिलांचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे गैरसमजातून मुलाने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर वडिल भिकाजी शंकर वगरे (Bhikaji Shankar Vagare) (वय 47) यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत माहिती अशी, अजित वगरे (Ajit Vagare) असं मुलाचे नाव आहे. अजित याला कोडोली पोलिसांनी (Kodoli Police) खूनाच्या आरोपाखाली अटक (Arrested) केली आहे. मृत भिकाजी वगरे यांचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या गैरसमजातून पत्नी व मुलगा यांच्यात सतत वाद व्हायचे. एक महिन्यापूर्वी भिकाजी व त्याचा मुलगा अजित यांच्यामध्ये ही वाद झाला होता. दरम्यान, गुरुवारी रात्री याच कारणावरून त्यांच्या राहत्या घरी त्यांची पत्नी आणि भिकाजी यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी चिडून भिकाजी याने आपल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. (Kolhapur Crime)

यानंतर त्यांचा मुलगा अजित याने आपल्या वडीलांना आईला का मारहाण केली? असा जाब विचारला. त्यामुळे मूलगा व वडील यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. हा वाद मारामारीत गेला. त्यातून मुलाने रागाच्या भरात घरातीलच लोखंडी फावडे वडीलांच्या डोक्यात घातले. डोक्यात वर्मी घाव लागल्याने ते वडिल खाली कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भिकाजी यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तत्पुर्वी त्यांचा मृत्यु झाला.

 

त्या दरम्यान मुलगा त्याच रात्री पसार झाला होता.
या घटनेची माहिती कोडोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयित आरोपी अजित वगरे (Accused Ajit Vagare)
याचा रात्रभर शोध घेऊन पहाटे अजित यास खूनाच्या आरोपाखाली अटक केली.
याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शितल कुमार डोईजड (API Sheetal Kumar Doizad) करत आहेत.

 

Web Title :- Kolhapur Crime | due to misunderstanding of immoral relationship son killed father in kolhapur district kodoli police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण ! प्रशांत बडगिरे यांच्याकडून पेपर विकत घेणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून अटक

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 695 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Omicron Covid Variant In Maharashtra | राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढला; रुग्ण संख्या पोहोचली 17 वर