Kolhapur Crime | दुर्देवी ! नरबळीची चर्चा पण 48 तासात ‘पर्दाफाश’; 6 वर्षाच्या बालकाशी जन्मदात्यानं केलं भयंकर ‘कृत्य’; जाणून घ्या प्रकरण

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime | शाहूवाडी (shahuwadi) तालुक्यातील वारणा कापशी येथील आरव केसरे या बालकाच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. तपासात चहासाठी जन्मदात्या पित्यानेच आरवची हत्या केल्याचे निषपन्न झाले आहे. राकेश रंगराव केसरे (वय २७, रा. कापशी, ता. शाहूवाडी) असे खुनी बापाचे नाव (Kolhapur Crime) आहे.

याबाबत पोलिसांनी (Kolhapur Police) दिलेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी राकेशला हॉटेलवर कामाला जायचे होते. तत्पूर्वी त्याला चहा हवा होता. घराबाहेर गेलेली पत्नी साधनाला बोलावून आणण्यास आरवला (वय – 6) सांगितले मात्र त्याने त्यास नकार दिला. त्यामुळे राकेशचा पारा चढला. त्याने आरवला आधी भिंतीवर आपटून, नंतर आरवच्या छातीवर जोराचा ठोसा मारला. यात आरव बेशुद्ध पडला. त्यानंतर भीतीपोटी राकेशने भीतीपोटी आरवचा गळा दाबून खून केला आणि लगबगीने घरामागील पडक्या खोलीत मृतदेह दडवून ठेवला. त्यानंतर आरव बेपत्ता झाल्याचा बनाव केला. तशी तक्रार ही पोलिसात दिली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना आरवचा मृतदेह घराजवळच्या बोळात आढळून आला. त्यावर हळद कुंकू टाकल्याचेही निदर्शनास आले. नरबळीच्या शक्यतेने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

मात्र दरम्यान, शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे आरवचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी वजनदार वस्तूचा घाव बसून छातीच्या दोन बरगड्या तुटलेल्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा पुन्हा बदलली.

दिवसभराच्या तपासानंतर ही बालकाच्या हत्येचे गूढ कायम होते. त्यानंतर नातलगांसह जवळपास १२ ते १५ जणांची कसून चौकशी केली. यामध्ये महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. माहितीतील विसंगतीमुळे हा तपास ठोस निष्कर्षाप्रत पोहोचला नसल्याचे सांगत यंत्रणेने कमालीची गोपनीयता बाळगली होती. मात्र, बालकाच्या हत्येमागील सूत्रधार म्हणून जवळच्या नातलगांवरच संशयाची सुई स्थिरावल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. पोलिसांनी बुधवारी सायंकाळी राकेशला चौकशीच्या बहाण्याने बोलावून घेत ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी त्याची पत्नी साधना, सासू, सासरा तसेच अविवाहित मेव्हणी यांना बांबवडे पोलिस दूरक्षेत्रात हलविले आणि तत्काळ राकेश याला बोलते करत पोलिसांनी त्याच्याकडून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या आरवचा राकेशने भीतीपोटी गळा आवळून जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पत्नी साधना हिचाही काटा काढण्याचा राकेशने कट रचला होता. मात्र आरव बेपत्ता झाल्यापासून घरात पाहुणे, नातलगांची वर्दळ असल्याने त्याचा तो कट फसला.

महत्त्वाचे म्हणजे पत्नीची हत्या करून तो स्वतः पोलिसात हजर होणार होता अशा कबुलीही राकेशने पोलिसांना दिली.
पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भा. दं. वि. च्या कलम 302, 201 अन्वये हत्या व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान तपासात दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून कापशी गावात बुधवारी दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.
जमाव गोळा करून जलदगतीने तपास (Kolhapur Crime) करून संशयितांना जेरबंद करण्याच्या मागणी
करू पाहणाऱ्यांना डीवायएसपी साळुंखे आणि पोलीस निरीक्षक विजय पाटील (Police Inspector Vijay Patil) यांनी संयम बाळगण्याचे केलेले आवाहन सफल ठरले.
तपासात अनेकांकडे चौकशी करण्यात आली. त्यामुळे दिवसभर अफवांचे पीक उठत राहिले.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे (SP shailesh balkawade) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरू होता.
अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे (addl sp tirupati kakde) यांनी कापशी गावात दिवसभर तळ ठोकला होता.
आरवच्या अंगावर हळद कुंकू आढळल्याने पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास केला.
त्यासाठी गावातील देवऋषी तसेच गंडेदोर्‍यांशी निगडित घटकांना चौकशीसाठी दोन ते तीनवेळा पाचारण केल्याने घटनेतील संभ्रम वाढला होता.
दुसर्‍या बाजूला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांसह काही पुरोगामी विचारांच्या
संघटनांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच महसूल प्रशासनाला निवेदन सादर करून गुन्ह्याची उकल करण्याचा तगादा लावला होता.
अखेर पोलिसांना या खुनाचा उलगडा करण्यात यश मिळाले.
राकेशनेच आपले कृत्य लपवण्यासाठी नरबळी वाटण्यासाठी मृतदेहावर हळद कुंकू टाकल्याची कबुली दिली आहे.
कोल्हापूर पोलिसांनी 48 तासात प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

Web Title :- Kolhapur Crime | kolhapur father killed 6 year old son arav in moment of anger kolhapur police done good job

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Accident News | उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे बस-ट्रकची समोरासमोर धडक; 8 जणांचा जागीच मृत्यू

Pune Crime | 10 लाखाच्या खंडणीचं प्रकरण : राजेश बजाज, बापू शिंदे यांच्यावर आणखी एक खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल

Ajit Pawar | अजित पवारांशी संबंधीत साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे, उपमुख्यमंत्री म्हणाले…