Kolhapur Crime | पुण्यातील चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी केली अटक

कोल्हापूर : Kolhapur Crime | पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे परिसरात घरफोड्या, वाहनचोरी करुन कोल्हापूरला पळून गेलेल्या चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Crime) अटक केली आहे.

गणेश नारायण आदमिले (वय ३४, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून मोपेड, एलईडी, मोबाईल असा ८५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांचे पथक कोल्हापूर शहरात गस्त घालत असताना त्यांना राजारामपुरीतील शाहू मील परिसरात एक मोपेडस्वार संशयास्पदरित्या जात असल्याचे आढळून आले. त्यांनी या मोपेडस्वाराला अडवून चौकशी केली. तेव्हा त्याने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याच्याकडील मोपेड ही चोरीचे असल्याचे आढळून आले. त्याच्याकडील माल त्याने तळेगाव दाभाडे येथून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. कोल्हापूर पोलिसांनी गणेश आदमिले याला अटक करुन तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आदमिले याच्याविरुद्ध कोल्हापूर, पुणे, मुंबईमध्ये सुमारे १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

हे देखील वाचा

Modi Government | खुशखबर ! आता सरकार मजूरांना दर महिना देणार 3,000 रुपये पेन्शन! ‘या’ पध्दतीनं करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

Kolhapur Megholi Irrigation Project | कोल्हापुरातील मेघोली प्रकल्प फुटला; महिलेचा मृत्यू, अनेक जनावरे दगावली

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Kolhapur Crime | Kolhapur police arrested a thief from Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update