Kolhapur Crime | मुंबई पोलीस दलातील पोलिसाने केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार, इयत्ता 10 वी ची मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime | दहावीत शिकणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन (15 वर्षे 5 महिने) मुलीवर (minor girl) मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात असलेल्या नात्यातीलच एका तरुणाने दोन वर्षे अत्याचार (rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुण हा विवाहित असून मुंबई पोलिसांत कार्यरत आहे. राजेंद्र गणपती पाटील Rajendra Ganpati Patil (वय-28 रा. करंजफेन, ता. पन्हाळा) असे गुन्हा (Kolhapur Crime) दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी राजेंद्र पाटील याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) (POSCO) गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही.

पीडित मुलीची मासिक पाळी न झाल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले. त्यावेळी ती गरोदर (pregnant) असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मुलगी अल्पवयीन असल्याने हे प्रकरण सीपीआरमध्ये नोंद होऊन पन्हाळा पोलिसांकडे (Panhala Police) चौकशीसाठी वर्ग केले. पन्हाळा पोलिसांनी मंगळवारी (दि.12) गुन्हा दाखल (Kolhapur Crime) केला असला तरी त्यांनी चौकशीमध्ये चार दिवस घालवले आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना समजल्यावर याची माहिती गुरुवारी (दि.14) देण्यात आली.
पीडित मुलगी 10 वीत शिकणारी आहे. सध्या ती दोन महिन्यांची गरोदर आहे.
तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने आरोपीचे नाव सांगितले.
या प्रकरणातील आरोपी पोलीस असल्याने पोलिसांनी कारवाई करण्यात दिरंगाई केल्याची चर्चा आहे.
पोलिसांनी गावातील लोकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
या जबाबात संबंधित पोलीस जुलैमध्ये गावी आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फिर्यादीत असे म्हटले, ही मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असतानाही त्याने मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून जून ते ऑगस्ट 2021 या कालावधीत करंजफेन येथील उत्तम केरबा पाटील यांच्या घरात अत्याचार केले. तसेच आपल्यात झालेले कोणाला सांगायचे नाही अशी धमकी देखील आरोपीने दिली.

हे देखील वाचा

Pune Police |  पुणे पोलिसांकडून नीलम राणे, नितेश राणे यांच्यावरील ‘लूकआऊट नोटीस’ रद्द

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलमधील भाववाढ सुरुच, जाणून घ्या आजचे दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Kolhapur Crime | mumbai police rape minor girl victim remained pregnant in kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update