‘त्या’ घाटात सापडले ५ वर्षापूर्वीच्या खुनातील मानवी हाडांचे ‘अवशेष’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – यशवंत बँक बालिंगा -आपटेनगर शाखेतील लुटप्रकरणी तपास करीत असताना कोल्हापूर पोलिसांना पाच वर्षापूर्वी आर्थिक वादातून झालेल्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले. पाच वर्षापूर्वी खुन करुन मृतदेह वैभववाडी घाटात टाकण्यात आले होते. सलग दोन दिवस शोध घेतल्यानंतर या खुनातील मानवी हाडांचा अवशेष वैभववाडी घाटात शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

कणेरीवाडीतील भैरवप्रसाद ऊर्फ सुनील पाटील याचा खून आर्थिक वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. संशयित आरोपींनी मृतदेह फेकलेली जागा दाखविली असून, त्यांना सोबत घेऊन वैभववाडी घाटात मृतदेहाचे अवशेष सापडतात काय, याचा शोध पोलीस गेले दोन दिवस घेत होते. शनिवारी मानवी हाडांचे अवशेष सापडले आहे. तो मृत भैरवप्रसादचा आहे काय, हे तपासण्यासाठी पुणे फॉरेन्सिक लॅबला पाठविला जाणार आहे.

यशवंत बँक बालिंगा-आपटेनगर शाखेतील लूटप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी राजू नेताजी सातपुते (वय २८, रा. कळंबा), विजय रामचंद्र गौड (३६, रा. निकम गल्ली, कळंबा) तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी करीत असताना त्यांनी तिसरा फरार आरोपी अक्षय ऊर्फ आकाश दाभाडे (३२, रा. कसबा बावडा) यांनी मिळून भैरवप्रसाद पाटील याचा पाच वर्षांपूर्वी खून केल्याची कबुली दिली आहे.

भैरवप्रसाद याची पत्नी प्रीती पाटील हिच्या संपर्कात संशयित विजय गौड होता; परंतु तिला पतीचा गौड याने खून केल्याची कल्पना नव्हती. भैरवप्रसादसोबत कसबा बावडा ते वडणगे मार्गावर दारू पीत बसले होते. भैरवप्रसाद हा व्याजाने पैसे देत असे. त्यातून संशयितांनी त्याच्याशी काही व्यवहार केले होते. त्यातून त्यांच्यात वाद होता. नियोजन करून त्यांनी भैरवप्रसादला बावडा-वडणगे रोडवर बोलावून घेतले होते. या ठिकाणी वाद होताच त्याचा खून करुन मृतदेह वैभववाडीच्या घाटात नेऊन टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गेले दोन दिवस पोलिसांचे पथक घाटात मृतदेहाचे अवशेष सापडतात काय, याचा शोध घेत असताना त्याच जागी एक मानवी हाडांचा अवशेष सापडला.

आरोग्यविषयक वृत्त –

नागपूरचे डायलिसिस केंद्र मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित होणार

जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही

राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय ; जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही

नेत्रदानात अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम