Kolhapur Crime News | सतत होत असलेल्या भांडणाला वैतागून आरोपी मुलाचा आपल्या आईवडिलांवर प्राणघातक हल्ला; कोल्हापूरमधील घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Crime News | कोल्हापूरमधील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या ठिकाणी मानसिक स्थिती ठीक नसलेल्या मुलाने आपल्या जन्मतात्या आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Kolhapur Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आरोपी सचिन कृष्णा गोरुले (वय 32 वर्ष, रा. बहिरेवाडी, ता. आजरा) हा आपल्या आई-वडिलांसोबत शाळेजवळ राहत होता. तसेच सचिन हा कागल येथे औद्योगिक वसाहतीत काम करत होता. काही वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. मात्र काही कारणाने त्याचा पत्नीसोबत घटस्फोट झाला. याचा त्याला धक्का बसल्याने त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्याचे सतत आई-वडिलांसोबत भांडण होत होते. घटनेच्या दिवशीदेखील सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास आरोपी सचिन आणि त्याच्या आईवडिलांमध्ये भांडण झाले. (Kolhapur Crime News)

यादरम्यान हा वाद विकोपाला गेल्याने सचिनने आधी आपल्या आईवर हल्ला केला.
यामध्ये ती गंभीर जखमी झाली आणि तिने घरातून पळ काढला.
यानंतर आरोपी सचिनने घराचे दरवाजे बंद करून घेत वडील कृष्णा बाबू गोरुले यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.
या हल्ल्यात कृष्णा गोरुले यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर सचिन घराचा दरवाजा बंद करून माळ्यावर जाऊन निवांतपणे झोपला.
यादरम्यान जखमी आईने बाहेर जाऊन आरडाओरड करून ग्रामस्थांना याची माहिती दिली.
यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर ग्रामस्थांनी जखमी महिलेला खासगी वाहनाने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
तसंच सचिन पळून जाऊ नये म्हणून घराचे पुढील व मागील दरवाजे नागरिकांनी बाहेरून बंद करून घेतले.
यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी मुलाला अटक केली आहे. तसेच पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Web Title :- Kolhapur Crime News | 32 year old son went to sleep on the mountain after attacking his parents in the house