Kolhapur Crime News | राज्य उत्पादक शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाकडून 67 लाखाचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

पोलीसनामा ऑनलाइन : Kolhapur Crime News | शुक्रवारी रात्री राज्य उत्पादक शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने गोवा बनावटीचे मद्य वाहनासह जप्त केले. यावेळी 67 लाख 3 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सुरेश रामजीवन बिशनोई (वय 24 राहणार ढाणी धोरीमान जिल्हा बारमेर राजस्थान) या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाला गोव्याहून बनावट दारू वाहनातून येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Kolhapur Crime News)

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला माहिती मिळताच जिल्हा अधीक्षक रवींद्र आवळे व उपअधीक्षक राजाराम खोत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने तावडे हॉटेल चौक परिसरात संध्याकाळपासून पाळत ठेवली होती. या ठिकाणी रात्री साडेदहाच्या सुमारास सर्विस रोडवर आयशर कंटेनर एमएच 08 एपी 5080 ही गाडी चौकशीसाठी थांबवण्यात आली. यावेळी पोलिसांनी चालकाकडे वाहनात भरलेल्या माला विषयी चौकशी केली असता वाहन चालकाने उडवा उडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली.

यावेळी वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये गोवा राज्य निर्मिती विदेशी मद्यपानाचे बॉक्स आढळून आले.
यानंतर तत्काळ वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले.
या व्यक्तीबरोबर अन्य व्यक्तीचा सहभाग आहे का त्याची तपासणी सध्या सुरू आहे. या आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी
अधिनियम 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सध्या राज्य उत्पादक शुल्क कोल्हापूर भरारी पथकाचे
निरीक्षक पी आर पाटील हे करत आहेत. निरीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह विजय नाईक एस. एल. नलावडे,
जवान सचिन काळेल, राजेंद्र कोळी,मारुती पवार, जय शिनगारे यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.

Web Title :-  Kolhapur Crime News | 67 lakh Goa fake liquor seized by Bharari squad of State Producer Duty Kolhapur Division

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hemant Rasane | रवीभाऊ, देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा, हेमंत रासनेंचा धंगेकरांना सल्ला

Aurangabad Accident News | अपघाताचे फोटो काढताना घडली दुर्दैवी घटना; 53 वर्षीय व्यक्तीला विनाकारण गमवावा लागला जीव

MPSC Recruitment | MPSC कडून तब्बल 673 जागांवर होणार भरती; सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी