Kolhapur Crime News | दुर्दैवी ! खेळत असताना पिठात पडल्यामुळे नाकातोंडात पीठ जाऊन 9 महिन्यांच्या बालकाचा अंत

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Crime News | कोल्हापूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे तालुक्यात हि घटना घडली आहे. यामध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन पिठाच्या भांड्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कृष्णराज राजाराम यमगर (वय 9 महिने, रा.जुना वाशीनाका) असे या मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. यानंतर कुटुंबियांच्या लक्षात हि गोष्ट आल्याने त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले मात्र त्यागोदरच नाका-तोंडात पीठ गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kolhapur Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कोल्हापुरातील जुना वाशीनाका येथे राहणाऱ्या सुप्रिया राजाराम यमगर या आपला नऊ महिन्याचा मुलगा कृष्णराज याला घेऊन करवीर तालुक्यातील वडणगे येथे आपल्या आजीकडे आल्या होत्या. यावेळी काल संध्याकाळच्या सुमारास कृष्णराज वॉकरमधून चालत खेळत होता. मात्र, चालता-चालता त्याचा तोल गेला आणि तो गव्हाच्या पिठाच्या भांड्यात पडला. भांड्यामध्ये पीठ मोठ्या प्रमाणात असल्याने कृष्णराजच्या तोंडात आणि नाकात गव्हाचे पीठ गेले आणि ते पीठ त्याच्या नाका-तोंडात चिकटून बसले. (Kolhapur Crime News)

यानंतर कुटुंबियांच्या लक्षात हि बाब येताच त्यांनी त्याला त्वरित त्या भांड्यातून बाहेर काढले आणि नाका तोंडात पीट गेल्याचे लक्षात येताच त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, दवाखान्यात नेण्यापूर्वीच नाकात आणि तोंडात पिठ चिकटल्यामुळे चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. नऊ महिन्यांच्या बालकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. करवीर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title :- Kolhapur Crime News | 9 month old baby has died in kolhapur karveer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri-Chinchwad Crime | किरकोळ कारणावरुन टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण, तीन जणांना अटक; चाकण परिसरातील घटना

Gadar 2 | ‘गदर 2’ चित्रपटातील ॲक्शन सीन लीक, Video आला समोर

Nawazuddin Siddiqui | अभिनेता नवाजुद्दीनच्या अडचणींमध्ये वाढ; पत्नीच्या आरोपांनंतर कोर्टाने बजावली नोटीस