Kolhapur Crime News | म्हशीचा धक्का लागल्याने विहिरीत पडून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू; कोल्हापूरमधील घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Crime News | कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात भारतनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विहिरीत पडून एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. कार्तिकी सचिन सुतार (वय 14 वर्ष) असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. कार्तिकी आपल्या आजीसोबत शेतामध्ये गेली होती, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. कार्तिकीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kolhapur Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
कार्तिकी आपल्या आजीसोबत शेतात गेली होती. यावेळी ती विहीरीतून पाणी काढत असतानाच शेजारी बांधलेल्या म्हशीचा तिला धक्का लागला. धक्का लागल्यामुळे कार्तिकी तोल जाऊन विहिरीमध्ये पडली. आपली नात विहिरीत पडल्याचे लक्षात येताच आजीने आरडाओरड केली. मात्र ग्रामस्थ येईपर्यंत फारच उशीर झाला. अखेर विहिरीच्या पाण्यात बुडून कार्तिकीचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आपली तरुण पोरगी गमावल्यामुळे सुतार कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title :- Kolhapur Crime News | girl dies after drowning in a well in kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Moolani’s Eye Care Centre | मुलानी आय केअर सेंटरच्या वतीने काचबिंदू जागृतीसाठी सायकल रॅली

Ahmadnagar Crime News | भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! भावाचा सख्ख्या चुलत बहिणीवर अत्याचार

IND vs AUS | ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करून विराट कोहलीने केला ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज