Kolhapur Crime News | कोल्हापूर हादरलं! मुलाच्या हव्यासापोटी पतीने काढला पत्नीचा काटा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Crime News | कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने मुलाच्या हव्यासापोटी आपल्या पत्नीचा खून (Murder) केला आहे. आजही काही ठिकाणी मुले- मुली असा भेदभाव केला जातो. केवळ वंशाचा दिवा पाहिजे म्हणून काही ठिकाणी महिलांवर अत्याचार केला जातो. या घटनेत देखील असेच घडले आहे. (Kolhapur Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दोनवडे या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या हव्यासापोटी पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. यानंतर आरोपी पतीने हत्या करुन विजेचा शॉक लागल्याचा बनाव केला होता. लागोपाठ मुली झाल्याने पतीकडून पत्नीचा छळ सुरु होता. अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलत आपल्या पत्नीची हत्या केली. आश्विनी एकनाथ पाटील असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती एकनाथ पाटील याला अटक केली आहे. (Kolhapur Crime News)

आज पहाटेच्या सुमारास हि घटना घडली आहे. पतीने दोरीच्या साहाय्याने गळा आवळून पत्नीचा खून केला आहे. आरोपी एकनाथ याने अश्विनीचा खून केल्याची तक्रार अश्विनीच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिल्याने पोलिसांनी तक्रारीवरून पती एकनाथ याला अटक केली आहे. करवीर पोलिसांनी एकनाथची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर हादरलं आहे.

Web Title :- Kolhapur Crime News | husband killed his wife for not having son in kolhapur couple have two daughter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shruti Haasan B’day | एकेकाळी अभिनेत्री श्रुती हसन ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती; ‘या’ चुकीमुळे झाला नात्याचा शेवट

Beed Crime | बीड हादरलं ! अनैतिक संबंधातून प्रेमीयुगुलाने उचलले टोकाचे पाऊल

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरचे साडीतले फोटो पाहून चाहते घायाळ; देसी लुकला दिला बोल्डनेसचा तडका