कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Crime News | कोल्हापुरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सावकाराच्या दादागिरीचा एक नवा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वडगणे गावातील एका कुटुंबाला मागच्या आठवड्याभरापासून सावकारांकडून दमदाटी आणि मारहाण होत असून कर्ज फेडा अन्यथा घरातील महिलांना वेश्या व्यवसायाला लावू अशा प्रकारची धमकी दिली जात आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसात तक्रार करूनदेखील पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कोल्हापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Kolhapur Crime News)
काय आहे प्रकरण?
पीडित कुटुंबाने घर बांधण्यासाठी सावकाराकडून 25 लाखांचं कर्ज घेतलं होतं. मात्र आता या बदल्यात सावकार 85 लाखाची मागणी करत असल्याची तक्रार पीडित कुटुंबांकडून करण्यात आली आहे. तसेच जर कर्ज फेडले नाहीतर घरातील महिलांना वेश्या व्यवसाय करायला लावू, अशी धमकी देखील या सावकाराने दिली आहे. या घरातून बाहेर पडा अन्यथा महागात पडेल अशा धमक्या सावकाराने पीडित कुटुंबाला दिल्या आहेत. एवढेच नाहीतर हा सावकार दररोज पुरुष आणि महिला गुंडांना पाठवून घरातील साहित्य बाहेर फेकत असे.
या प्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली मात्र पोलीस आपल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. पोलिसांकडून उद्या बघू.. असं सारखं उत्तर मिळत आहे. त्यामुळे आता हे कुटुंब थेट पोलिस अधीक्षकाकडे न्याय मागण्यासाठी जाणार आहे. मागच्या आठवड्यापासून हा प्रकार सुरु असल्याने हे संपूर्ण कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे.
Web Title :- Kolhapur Crime News | moneylender threat women over loan recovery
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime News | विश्रामबाग परिसरातील जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या ‘सासु’चा छापा
- Chitra Wagh | ‘भीम आर्मी’ची भाजपनेत्या चित्रा वाघ यांना धमकी; म्हणाले…
- Maharashtra Political Crisis | शिवसेना कुणाची? यावर आज निवडणुक आयोगापुढे महत्वाची सुनावणी