Kolhapur Crime News | पोलिसांच्या हातावर तुरी देऊन CPR मधून पळालेल्या कैद्याला पकडण्यात पोलिसांना यश

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Crime News | सीपीआरमध्ये उपचारासाठी आणल्यानंतर पोलीस आणि डाॅक्टरांच्या हाती तुरी देऊन फरार झालेल्या कैद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल साडेसात तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. तो पळून गेल्यानंतर ऊसाच्या शेतात लपून बसला होता. यानंतर संध्याकाळ झाल्याने पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी यापूर्वी मिरजेतील रुग्णालयातूनही पळून गेला होता. त्यावेळेस तो तब्ब्ल 20 दिवस उसाच्या शेतात बसून होता. निवास अरविंद होनमाने (वय 35, रा. येळावी, तासगाव, जि. सांगली) असे या आरोपीचे नाव आहे. (Kolhapur Crime News)
काय घडले नेमके?
कैद्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आलं होतं. यावेळी एका कैद्यासोबत दोन, तर दोन कैद्यासोबत तीन पोलीस असतात. यामध्ये एक बंदूकधारी पोलीस असतो. या बंदोबस्तामध्ये कैद्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले होते. पळून जाणाऱ्या कैद्याला क्षयरोगाचा त्रास असल्याने त्याला सीपीआरसाठी आणण्यात आले होते. त्याच्या हातात त्यावेळी बेड्या होत्या. उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कैद्याच्या कागदपत्रांची तपासणी केली. यादरम्यान आरोपी त्यांना धक्का येऊन त्याठिकाणाहून पळून गेला. महिला कर्मचाऱ्याच्या हि बाब लक्षात येताच त्यांनी कैदी पळाला म्हणत ओरडा केला. यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो नेमका कुठे गेला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. (Kolhapur Crime News)
संपूर्ण परिसर पिंजून काढला
हा आरोपी कैदी फरार झाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. यानंतर त्यांनी या आरोपीला शोधण्यासाठी सीसीटीव्हीचा आधार घेतला. हा आरोपी पळून जरी गेला असला तरी त्याच्या हातात बेड्या होत्या. हा आरोपी सीपीआरच्या भिंतीवरून उडी मारल्यानंतर हातातील बेडी लपवत दसरा चौकातून शहाजी कॉलेजच्या दिशेने निघून गेला. यानंतर तो विन्स हॉस्पिटलकडे जाणाऱ्या नागाळा पार्क रस्त्याकडून तो शेतवडीत पोहोचला. याठिकाणी तो दिवसभर उसाच्या शेतात लपून बसला. यानंतर रात्र पडल्यानंतर त्याचा पळून जाण्याचा प्लॅन होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Web Title :- Kolhapur Crime News | prisoner who absconded from cpr hospital kolhapur arrested after 7 hours search operation
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
HSC Paper Leak Case | बारावी पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक