Kolhapur Crime News | आईचा खून करून काळीज भाजून खाण्याचा प्रयत्न; नराधम मुलाला फाशीची शिक्षा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Kolhapur Crime News |कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur district) आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना चार वर्षापूर्वी घडली होती. कोल्हापूरच्या या घटनेचा निकाल लागला असून नराधम मुलाला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचा खून (Murder) करुन काळीज भाजून खाण्याचा प्रयत्न या नराधम मुलाने केला होता. अखेर कोल्हापूर न्यायालयाने (Kolhapur court) फाशीची शिक्षा सुनावली असून कोल्हापूर (Kolhapur Crime News) जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे.

जिल्ह्यातील दुर्मिळ घटना

सुनिल रामा कुचीकोरवी (Sunil Rama Kuchikorvi) असे फाशीची शिक्षा झालेल्या नराधम मुलाचे नाव आहे. सुनिल याने आपल्या जन्मदात्या आईचा निर्घृणपणे खून केला होता. या प्रकरणाचा चार वर्षानंतर निकाल लागला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालावर कोल्हापूरमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात न्यायधीश महेश जाधव (Mahesh Jadhav) यांच्यासमोर या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. ही कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्मिळ घटना समजून सुनिल याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.

काय आहे प्रकरण ?

कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या (Shahupuri Police Station) हद्दीत 28 ऑगस्ट 2017 रोजी माकडवाला वसाहतीत ही घटना घडली होती. आरोपी सुनील कुचीकोरवी याने आपली आई यल्लवा कुचीकोरवी (वय-62) यांचा निर्घृण खून केला होता. सुनील दारुच्या आहारी गेला होता. त्याने आपल्या आईकडे दारुसाठी पैसे मागितले होते. परंतु आईने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या सुनीलने आईचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केला.

शरीराचे तुकडे करुन ठेवले फ्रिजमध्ये

आरोपी सुनील एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आईला मारुन, विवस्त्र केलं. तिचे स्तन कापले,
काळीजाचे तुकडे केले होते. गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केले. एवढंच नाहीतर आईच्या शरीराचे
तुकडे करुन ते फ्रिजमध्ये भरुन ठेवले होते. धक्कादायक म्हणजे, आईच्या शरीराचे तुकडे भाजून
खाण्याच्या तयारीत होता. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सुनील याला अटक केली
होती.

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यात दोन अल्पवयीन मुलांकडून 15 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, नग्न फोटो काढून 1.75 लाख उकळले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Kolhapur Crime News | son sunil rama kuchikorvi sentenced to death in mothers murder case kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update