Kolhapur Crime | पीडित पत्नीची सुटका करून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पतीला कोल्हापूर पोलिसांकडून अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Crime | कोल्हापुरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आपल्या पत्नीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन घरातच वेश्या अड्डा चालू करणाऱ्या आरोपी पतीस पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पीडित महिलेची सुटका केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार बालिंगा परिसरात एका घरातच वेश्या अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा पती आपल्या पत्नीच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवत वेशा अड्डा चालवत असल्याचे उघडकीस आले. पीडित महिला आणि तिचा पती हे दोघे मूळचे कर्नाटक राज्यातील आहेत. हे दोघेजण घर भाड्याने घेऊन त्या ठिकाणी राहत होते. (Kolhapur Crime)

 

दोन महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई
दोन महिन्यांपूर्वीच कोल्हापुरात वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून दोन जणांना अटक केली होती. त्यांच्या तावडीतून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली होती. करवीर तालुक्यातील कंदलगाव या ठिकाणी हा सगळा प्रकार सुरु होता. या ठिकाणी गरीब, गरजू महिलांना लॉजिंगवर बोलावून तेथे त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जायचे. (Kolhapur Crime)

अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार करून खंडणीची मागणी
सांगलीमधील विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचारी स्वप्नील विश्वास कोळी (वय 39, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) याला जबरदस्तीने वेश्‍या व्यवसायास जुंपलेल्या बांगलादेशी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला कामावरून निलंबित करण्यात आले आहे. तसेच स्वप्नील विश्वास कोळी याच्यावर तो कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीसह सात लाखांच्या खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पीडित तरुणीची फिर्याद दाखल करून घेतली आहे.

 

Web Title :- Kolhapur Crime | prostitute racket busted by kolhapur police one arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

Pune Crime News | पत्नीवर वार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

SSC Exam | ऑल द बेस्ट! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु, राज्यात 15 लाख 77 हजार विद्यार्थी देणार परीक्षा