Kolhapur Crime | … म्हणून वडिलानं पोटच्या 5 वर्षाच्या मुलाला फेकलं पंचगंगा नदीत; इचलकंरजीतील धक्कादायक प्रकार

कोल्हापूर / इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाइन Kolhapur Crime | एका निष्ठूर वडिलाने औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याच्या कारणावरून स्वताच्या 5 वर्षाच्या मुलाला इचलकरंजीतील ( Kolhapur Crime) पंचगंगा नदीत (Panchganga river) फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकिस आली आहे. ही घटना हातकंणगले तालुक्यातील इचलकरंजी येथे घडली आहे. मुलाला नदीत फेकून दिल्यावर खुद्द वडिलानं पोलिसांना कबुली दिलीय. याप्रकरणी सिकंदर हुसेन मुल्ला (Sikandar Hussain Mulla) (वय, 48 रा. कबनूर ता. हातकणंगले) असं त्या वडिलाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी वडिलाला ताब्यात (Arrested) घेतलं आहे.

याबाबत माहिती अशी, अफांन सिकंदर मुल्ला (Afan Sikandar Mulla) ( वय 5) असं त्या मुलाचं नाव आहे.
वडिल सिकंदर हा अपंग असून मिळेल तेथे मजुरीचे काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे.
त्यामुळे तो अनेक वेळा घराबाहेरच असतो. त्याला 10 वर्षाची मुलगी व अफान अशी 2 मुले आहेत. मागील काही महिन्यापासून त्यांच्यात कौटुंबिक वाद आहे.
अफान याला फिट्सचा आजार असल्याने औषधोपचाराचा खर्च त्याला झेपत नाही. या कारणावरूनही त्यांच्यात वारंवार वाद होत होता.
सिकंदर हा काही दिवस घराबाहेर होता त्याला पत्नी व मेहुणा यांनी शोधून 2 दिवसांपूर्वी घरी आणले.
परत आल्यानंतर मुलाच्या औषधोपचारावरून त्याला खडे बोल सुनावले. त्यामुळे तो रागात होता.

 

गुरुवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान उपचारासाठी जावूया म्हणून सायकलवरून अफानला घेऊन घराबाहेर पडला.
रात्री घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याचे नातेवाईकांना सांगितले. मात्र, त्याच्या सांगण्यावरुन घरच्यांना पटले नाही.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही अफान सापडत नसल्याने नातेवाईक व नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
त्यावेळी त्याने पोलिसांसमोर कबुली दिली. सध्या मुलाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
अधिक तपास इचलकरंजी शिवाजीनगर पोलिस (Ichalkaranji Shivajinagar Police) करीत आहेत.

 

Web Title : Kolhapur Crime | shocking news 5 year old boy was thrown panchganga river his father ichalkaranji kolhapur district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LPG Commercial Gas Cylinder Price | LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ; 43 रुपयांनी महागला

Ajit Pawar | दुसरा डोस घेतलेल्यामध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त, अजित पवारांनी सांगितले कारण (व्हिडीओ)

Hair beauty tips | ओल्या केसात कधीही करू नका या 7 चूका, होतील खराब, जाणून घ्या सविस्तर