Kolhapur Crime | धक्कादायक ! ‘बेपत्ता’ मुलीला सावत्र पित्यानेच पंचगंगा नदीत फेकले

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन  Kolhapur Crime । कोल्हापूरच्या (Kolhapur) हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हातकणंगले (Hatkanangale) तालुक्यातील यळगूड (Yalgud) येथून दोन दिवसापासून बेपत्ता (Disappeared) असलेल्या 9 वर्षीय मुलीला (9 year old girl) सावत्र पित्यानेच इचलकरंजीमधील पंचगंगा नदीत फेकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना (सोमवारी) 8 ऑगस्ट रोजी उघडकीस आलीय. मुलगी हरवल्याची तक्रार देणाऱ्या वडिलांस पोलिसांनी पोलखोल चौकशी केल्यावर केलेल्या कारनाम्याची कबुली दिली आहे. प्रणाली युवराज साळुंखे असं त्या 9 वर्षीय मुलीचं नाव आहे. याप्रकरणी युवराज आत्मारास साळुंखे (वय, 39) याला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे.

अधिक माहिती अशी, युवराज साळुंखे (Yuvraj Salunkhe) हा चांदी कारागीर आहे.
त्याचा यापूर्वी 2 वेळा विवाह (Marriage) झाला आहे. पण, अपत्य होत नसल्यामुळे त्याने दोन्ही पत्नींना सोडचिठ्ठी दिली आहे.
२ वर्षांपूर्वी त्याने इचलकरंजी येथील एका विवाहित महिलेशी तिसरा विवाह केला.
संबंधित महिलेला पहिल्या पतीपासून प्रणाली (Pranali) ही मुलगी होती.
प्रणालीची देखभाल करण्याच्या अटीवर झाले होते.
परंतु, काही महिन्यांपासून युवराज सतत प्रणाली हिच्याबरोबर फटकून वागत होता.
यावरून घरात वाद निर्माण व्हायचा. तसेच, त्याची पत्नी पुन्हा गर्भवती आहे.
म्हणून सावत्र मुलगी प्रणालीवर तो चिडत होता.

दरम्यान, प्रणाली 22 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास बेपत्ता झाली.
याबाबत तक्रार युवराजने हुपरी पोलिस ठाण्यात (Hupari Police Station) दिली.
2 दिवस पोलीस प्रणालीच्या शोधात होते. तसेच नातेवाईक देखील वेगाने शोध घेत होते.
परंतु युवराज त्यांना थांबवत होता. यावरून नातेवाईकांना त्याचा संशय आला.
तसेच पोलिसांना देखील गडबड वाटली.
यावरून पोलिसांनी युवराजची पोलखोल चोकशी केली असता त्यावेळी या घटनेचे बिंग फुटले.

 

तसेच, सावत्र पिता युवराजच्या कबुलीनंतर पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत, शिवाजीनगरचे एपीआय प्रमोद मगर (API Pramod Magar) यांच्यासह पथकाने पंचगंगा नदी (Panchganga river) घाटावर तपासास गेले.
नंतर हुपरी पोलिसांनी (Hupari police) युवराजला ताब्यात घेऊन घटनास्थळी आणले.
तपासाअंती पंचगंगा नदीवर प्रणालीचे चप्पल सापडले.
नंतर पालिकेचे आपत्कालीन पथक आणि बोटीच्या माध्यमातून शोध घेतला.
रात्री उशिरा पर्यंत प्रयत्न सुरु होता.
नंतर सकाळी (मंगळवार) पुन्हा शोध घेण्यात आला.
या दरम्यान, प्रणाली हिची आई रक्षा बंधनानिमित्त घरी स्नेहभोजनाच्या तयारीत गुंतल्याचे साधून युवराजने प्रणालीला फिरायला जाऊया, असे सांगून बाहेर नेले.
आणि हुपरी रस्त्यालगत असलेल्या पंचगंगा नदी घाटावर आणून तिला अत्यंत निर्दयपणे नदीत ढकलून दिले. नंतर तोच पोलीस ठाण्यात (Hupari Police Station) जाऊन तक्रार दाखल केला की मुलगी बेपत्ता झाली आहे. असं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.

 

Web Title : Kolhapur Crime | Shocking! The ‘missing’ girl was thrown into the Panchganga river by her stepfather

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यातील शिवसैनिक आक्रमक; भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या (व्हिडीओ)

आता WhatsApp द्वारे बुक करू शकता कोविड व्हॅक्सीनेशनचा स्लॉट, जाणून घ्या सोपी पद्धत

Modi Government | देशाची 60 ‘खरब’ची (Trillion) मालमत्ता विकणार मोदी सरकार; प्लान समोर ठेवून सितारमन म्हणाल्या – ‘मालक सरकारच असणार’