Kolhapur Crime | धक्कादायक ! कमांडोज हाफ मॅरेथॉनचा मुख्य आयोजक वैभव पाटीलची आत्महत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Crime | कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विविध राज्यातील स्पर्धकांना लाखो रुपये बक्षिसांचे आमिष दाखवून मॅरेथॉन (Marathon) च्या माध्यमातून नोंदणी शुल्क घेऊन फरार झालेला “कमांडोज हाफ मॅरेथॉन“ (Commandos Half Marathon) स्पर्धे”चा मुख्य आयोजक वैभव पाटील (Vaibhav Patil) याने रविवारी पहाटे तिरपण गावी शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली. यादरम्यान मॅरेथॉन मध्ये फसवणूक (Fraud) झालेल्या स्पर्धकांनी शनिवारी रात्री उशिरा आयोजक वैभव पाटील याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात (Shahupuri Police Station) फसवणुकीची तक्रार दाखल (Kolhapur Crime) केली.

 

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, हरियाणा, पंजाब, पश्चिम बंगाल आदी राज्यातून स्पर्धकांनी या कमांडोज हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यासाठी विविध गटानुसार 600 ते 1800 रुपये पर्यंतचे नोंदणी शुल्क आकारण्यात आले होते. या स्पर्धेसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत स्पर्धक कोल्हापुरात दाखल झाले होते. मात्र या दरम्यान या स्पर्धेचा आयोजक वैभव पाटील हा अचानक गायब झाल्याने खेळाडूत खळबळ माजली होती. यानंतर अनेक खेळाडूंनी फसवणूक झाल्याने एमसीएसएफ वेल्फेअर फाउंडेशनच्या (MCSF Welfare Foundation) न्यू शाहुपुरी येथील बेकार गल्लीतील कार्यालयाकडे धाव घेतली त्या ठिकाणी कार्यालयास टाळे आढळून आले. यानंतर अनेक खेळाडूंनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन स्पर्धेचा मुख्य आयोजक वैभव पाटील याच्याविरोधात फसवणुकीची (Fraud) तक्रार दाखल केली. (Kolhapur Crime)

यानंतर आज सकाळी वैभव पाटील याने तिरपण येथे गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या का केली? त्याने मॅरेथॉनच्या माध्यमातून खेळाडूंकडून
जमा केलेले पैसा कुठे गेले? या सगळ्या प्रश्नांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पाटील यांच्या आत्महत्येची पन्हाळा पोलीस ठाण्यात (Panhala Police Station) नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title :- Kolhapur Crime | suicide of vaibhav patil chief organizer of commandos half marathon