Kolhapur Crime | डोक्यात दगड घालून अपंग पतीचा पत्नीने केला खून; प्रचंड खळबळ

गडहिंग्लज : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime | भडगाव (ता गडहिंग्लज) (Gadhinglaj) येथे अपंग पतीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून (Murder in Kolhapur) केल्याची घटना (Kolhapur Crime) उघडकीस आली आहे. हा प्रहार इतका जबरदस्त होता की, पतीचा तडफडून मृत्यू झाला आहे. शीतल गजानन गाडवी (Sheetal Gajanan Gadavi) असं हत्या झालेल्या अपंग पतीचं नाव आहे. तर याप्रकरणी पत्नी गायत्री शीतल गाडवी (Gayatri Sheetal Gadavi) हिला पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गाडवी दाम्पत्य आपली दोन लहान मुलांसमवेत भडगाव (Bhadgaon) येथे वास्तव्याला होते. अर्धांगवायूने ग्रासलेल्या शीतल यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे घराशेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शीतल आणि गायत्री यांच्यात दारूच्या व्यसनाने सतत वाद होत होते. घटनेच्या दिवशीही त्याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. दारूच्या नशेत शीतलने पत्नी गायत्रीला अश्लील शब्दात शिव्या देत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या गायत्रीने रागाच्या भरात शीतल यांच्या डोक्यात थेट दगड घातला. (Kolhapur Crime)

 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शीतलला पाहून गायत्री घाबरली तिने रुग्णवाहिका बोलवली. पण तो पर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांना (Police) मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गायत्रीला अटक (Arrested) केली असून तिने खुनाची कबुली दिली.

 

Web Title :- Kolhapur Crime | wife killed husband by attack with stone in gadhinglaj kolhapur news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा