रस्त्याच्या कडेला उभ्या सिमेंट मिक्सरला धडकून तरुण ठार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिमेंट मिक्सरला दुचाकी ध़डकून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

यश आदेश चव्हाण (वय १८) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ठिकपुर्ली – घोटवडे हद्दीवर अशलेल्या शेतात चव्हाण कुटुंबियांचा घरगुती कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांपैकी एकाला सोडण्यासाठी यश हा परिते गावात गेला होता. त्यानंतर तो तिथून शेताकडे परतत असताना रस्त्याच्या कडेला लावलेल्या एखा सिमेंट मिक्सर यंत्राला त्याच्या दुचाकीची धडक बसली. या धडकेत तो गंभीरजखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.