कोल्हापुरात राष्ट्रवादीनंतर काँग्रेसलाही मोठं ‘खिंडार’ !

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे.  राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षांतर करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडून  जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेसला धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी राजीनामा दिला आहे . आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचे किंवा शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.

प्रकाश आवाडेंकडे 6 महिन्यांपूर्वीच कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती.  त्यांनी पक्षाच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत तसेच पक्षाकडून दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

राजीनामा देण्याविषयी प्रकाश आवाडे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने कोल्हापूर जिल्ह्यात आमच्यासोबत दुजाभाव केला. त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. आगामी विधानसभा अपक्ष म्हणून लढू. तसेच 2 दिवसांमध्ये शिवसेना प्रवेशावर भूमिका स्पष्ट करू.’

You might also like